तीन वर्षे बदली करु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:06 PM2019-06-03T22:06:10+5:302019-06-03T22:06:31+5:30

शिक्षकांच्या बदल्या संदर्भातील २८ मे २०१९ च्या शासन निर्णयामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होणार असल्याने हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा तसेच मागील वर्षी पतीपत्नी एकत्रिकरणातून झालेल्या बदलीतील जोडीदारास बदलीस पात्र ठरवू नये आणि दोघांचीही तीन वर्ष बदली करुन नये यासह अनेक मागण्यांचे निवेदन राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.

Do not change for three years | तीन वर्षे बदली करु नका

तीन वर्षे बदली करु नका

googlenewsNext
ठळक मुद्देपालकमंत्र्यांना निवेदन : ग्रामीण विकास सचिवांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शिक्षकांच्या बदल्या संदर्भातील २८ मे २०१९ च्या शासन निर्णयामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होणार असल्याने हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा तसेच मागील वर्षी पतीपत्नी एकत्रिकरणातून झालेल्या बदलीतील जोडीदारास बदलीस पात्र ठरवू नये आणि दोघांचीही तीन वर्ष बदली करुन नये यासह अनेक मागण्यांचे निवेदन राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.
पतीपत्नी एकत्रिकरण व मागील वर्षी झालेल्या बदल्यामधील विस्थापित आणि रॅडम राऊंडमधील शिक्षक तसेच एकल शिक्षक या सर्वांच्या सोयीच्या बदल्या व्हाव्या. मूळ शासन निर्णयातील तरतुदी प्रमाणे टप्याटप्याने बदली करावी, त्यामुळे एकल शिक्षकाला न्याय मिळेल. अशा समस्यांसदर्भात प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पालकमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार रामदास तडस यांनाही निवेदन देण्यात आले. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी शिक्षकांच्या या निवदेनाची दखल घेऊन ग्रामीण विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सोबत संपर्क साधून चर्चा केली. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात झालेल्या चर्चेदरम्यान आमदार समीर कुणावार, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार दादाराव केचे व जि.प. अध्यक्ष नितीन मडावी व सभापती जयश्री गफाट व मुकेश भिसे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनिल गफाट, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने उपस्थिती होते. शिक्षक संघाच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष लोमेश वºहाडे, विभागीय अध्यक्ष अरुण झोटिंग, अजय गावंडे, सुनिल कोल्हे, अनिल पवार, पंढरी तडस, मोहन कोठे, दीप नाखले, आशिष सोनटके, प्रफुल्ल लिखार, गोविंद वाटगुळे, अरविंद बगडे, संजय भगत, दिलीप झाडे, गजानन सोरट, उल्हास शेळके, किशोर बोरकुटे, सुनिल देवढे, मनवरे आदी उपस्थित होते.

बदली प्रक्रियेवरून गोंधळाची स्थिती कायम
वर्धा जिल्हा परिषदेत गेल्या वर्षी करण्यात आलेल्या बदल्यामध्ये मोठा घोळ झाला आहे. यात अनेक शिक्षकांवर अन्याय झाला आहे. आंतर जिल्हा बदलीत अनेक शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यातून बदलून आलेत त्यामुळे अनेक जण अतिरिक्त ठरले. त्यांना न्याय देण्यात आला नाही, अशी स्थिती आहे.

Web Title: Do not change for three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.