२,११० शेतकऱ्यांची कागदपत्रे पाठविली बँकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 05:00 AM2020-06-17T05:00:00+5:302020-06-17T05:00:27+5:30

कोरोना संकटातच खरीप हंगाम तोंडावर असल्याने सध्या शेतकरी पीककर्जासाठी बँकांमध्ये गर्दीत करीत आहे. पीककर्जासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातून सातबारा, पेरापत्रक, आठ-अ, फेरफार पंजी मिळवून ती पीककर्जाच्या प्रस्तावाला जोडणे गरजेचे असते. हिच कागदपत्रे कोरोना काळातही शेतकऱ्यांना वेळीच उपलब्ध व्हावी म्हणून तालुकास्तरावर तहसीलदारांनी विशेष काळजी घेत योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या.

Documents of 2,110 farmers sent to the bank | २,११० शेतकऱ्यांची कागदपत्रे पाठविली बँकेत

२,११० शेतकऱ्यांची कागदपत्रे पाठविली बँकेत

googlenewsNext
ठळक मुद्देपीककर्ज : वर्धा तहसील कार्यालयात ४८ तासांत होतोय निपटारा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा प्रसार होऊ नये तसेच शेतकऱ्यांना पीककर्जासाठी आवश्यक कागदपत्रे झटपट मिळावे या हेतूने वर्धा तालुका प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वेगळी यंत्रणा उभी केली आहे. याच यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत वर्धा तालुक्यातील २ हजार ११० शेतकऱ्यांचे पीककर्जासाठीचे आवश्यक कागदपत्रे बँकांना पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे बँकांकडून यादी प्राप्त झाल्यावर वर्धा तहसील कार्यालयाकडून ४८ तासांतच प्रकरणांचा निपटारा केला जात आहे.
कोरोना संकटातच खरीप हंगाम तोंडावर असल्याने सध्या शेतकरी पीककर्जासाठी बँकांमध्ये गर्दीत करीत आहे. पीककर्जासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातून सातबारा, पेरापत्रक, आठ-अ, फेरफार पंजी मिळवून ती पीककर्जाच्या प्रस्तावाला जोडणे गरजेचे असते. हिच कागदपत्रे कोरोना काळातही शेतकऱ्यांना वेळीच उपलब्ध व्हावी म्हणून तालुकास्तरावर तहसीलदारांनी विशेष काळजी घेत योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वर्धा तहसील कार्यालयात विशेष यंत्रणा उभी करण्यात आली आहे. याच यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत २ हजार ११० शेतकऱ्यांचे पीककर्जासाठीचे आवश्यक कागदपत्रे वर्धा तहसील कार्यालयाकडून बँकांना पाठविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

तालुक्याबाहेरील १५४ शेतकऱ्यांना मिळाला आधार
यादी प्राप्त झाल्यानंतर प्रकरण निकाली काढताना १५४ शेतकरी तालुक्याबाहेरील असल्याचे पुढे आले. या शेतकऱ्यांचेही पीककर्जासाठीचे आवश्यक कागदपत्रे बँकांना पाठविण्यात आले आहेत. यात सेलू १०५, देवळी २८ तर हिंगणघाटच्या २८ शेतकºयांचा समावेश आहे.

अशी निकाली निघताय प्रकरण
बँकेकडून ई-मेल द्वारे शेतकऱ्यांच्या नावाची यादी तहसील कार्यालयाला प्राप्त होते. त्यानंतर या यादीची प्रिंट कनिष्ठ लिपीक कुणाल डबरे घेत ती तलाठी विभागाला पाठवितो. सोनाली भोयर व त्यांचे सहकारी सातबारा, आठ-अ, नकाशा गोळा करतात. तर रेकॉर्ड रुम मधील खंडाकर, राऊत, गोटे, मेश्राम, संदीप सुरकार, लोचन गुरनुले, हर्षल बधेकर, अमोल काटकर हे शेतकऱ्यांच्या फेरफार पंजीचा शोध घेऊन त्याची प्रमाणीत प्रत गोळा करतात. त्यानंतर हे संपूर्ण कागदपत्रे बमनोटे या शिपायामार्फत बँकांमध्ये पाठविले जातात.

१०७ याद्या निकाली
एखाद्या शेतकऱ्याने पीककर्जासाठी बँकेत आवेदन केल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या प्रकरणाला लागणाऱ्या आवश्यक कागदपत्राची मागणी बँकेकडून तहसील कार्यालयाकडे केली जाते. आतापर्यंत वर्धा तहसील कार्यालयाला शेतकऱ्यांच्या ११३ याद्या बँकांकडून प्राप्त झाल्या. त्यापैकी १०७ याद्यातील शेतकऱ्यांची कागदपत्रे तहसील कार्यालयाने बँकांना पाठविले आहे.

बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावाची यादी प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन पीककर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ४८ तासांच्या आत बँकांना पुरविले जात आहे. यासाठी विशेष यंत्रणा वर्धा तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात आली आहे.
- डॉ. शकुंतला पाराजे, नायब तहसीलदार, वर्धा.

Web Title: Documents of 2,110 farmers sent to the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.