चार महिन्यांपासून दिलेली कागदपत्रे धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:42 AM2018-05-13T00:42:57+5:302018-05-13T00:42:57+5:30

चणा व तूर खरेदीच्या नाफेडच्या आॅनलाईन प्रक्रियेचे देवळीत तीनतेरा वाजले आहे. जानेवारी ते फेब्रुवारी पासून तुरीच्या आॅनलाईन प्रक्रियेसाठी दिलेल्या कागदपत्रांची नाफेड प्रशासनाने कुठेही नोंद न घेतल्याने या परिसरातील शेकडो शेतकरी वाऱ्यावरच आहेत.

The documents issued for four months in the dust | चार महिन्यांपासून दिलेली कागदपत्रे धूळखात

चार महिन्यांपासून दिलेली कागदपत्रे धूळखात

Next
ठळक मुद्देशेकडो शेतकरी वाऱ्यावर : व्यापाऱ्यांच्या बाजूने मार्केटिंग व खविसच्या कर्मचाऱ्यांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : चणा व तूर खरेदीच्या नाफेडच्या आॅनलाईन प्रक्रियेचे देवळीत तीनतेरा वाजले आहे. जानेवारी ते फेब्रुवारी पासून तुरीच्या आॅनलाईन प्रक्रियेसाठी दिलेल्या कागदपत्रांची नाफेड प्रशासनाने कुठेही नोंद न घेतल्याने या परिसरातील शेकडो शेतकरी वाऱ्यावरच आहेत. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांचा डोळेझाकपणा तसेच खविस कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ते व्यापाऱ्यांच्या बाजूनेतर नाही ना असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
व्यापाºयांची बाजू सावारल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येत असलेली शासनाची सदर योजना शेतकºयांसाठी फसवी ठरू पाहत आहे. या बाबीची जिल्हाधिकारी व डीडीआर यांनी गंभीर दखल घेवून उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे. या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी तुरीच्या आॅनलाईन प्रक्रियेसाठी जानेवारी व फेब्रुवारी दरम्यान सातबारा व इतर कागदपत्रे दिली. परंतु, नाफेड व खविस प्रशासनाने या सर्व कागदपत्रांची रजिस्टरवर कुठेही नोंद न घेतल्याने ही कागदपत्रे अजूनही धुळखात पडली आहेत. गेल्या चार महिण्यांपासून पायपीट करून सुद्धा न्याय मिळत नसल्याने गरजू ठरलेले कास्तकार खरीप हंगामाच्या तोंडावर हवालदिल झाले आहे. आजपावेतो या केंद्रावर ८ हजार २३७ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. परंतु, यापैकी बहुतांश खरेदी सोयीबीनची व तीही व्यापाऱ्यांच्या झोळीत टाकण्यात आली. उर्वरीत नऊ ते दहा हजार क्विंटल तुरीचे कागदपत्रे अजूनही आॅनलाईन प्रक्रियेसाठी प्रतीक्षेत आहे. तर कागदपत्रे धुळ खात आहेत. प्रत्येक्षात आॅनलाईन प्रक्रियेसाठी आलेल्या शेतकऱ्यांची क्रमाक्रमाने नोंदणी करून तितकाच माल मोजणे क्रमप्राप्त आहे. मात्र, घाई झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ही पद्धत मोडीत काढून व्यापाऱ्यांच्या मालाला महत्त्व दिले आहे. त्यामुळे तुरीने भरून असलेले खाजगी व्यापाऱ्यांची गोदामे नाफेडच्या खरेदीत खाली झाली. लाखोंचा मलीदाही लाटण्यात आला. इतेच नव्हे तर शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
काही शेतकºयांना अश्रुही झाले अनावर
शेतकरी वासूदेव कांबळे यांनी २ मे रोजी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणली; पण त्यांना विविध कारणे पुढे करीत शेतमाल परत नेण्यास सांगण्यात आले. या हवालदिल झालेल्या शेतकºयाने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

Web Title: The documents issued for four months in the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी