जिल्ह्यात ७ हजार ११९ नागरिकांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 06:00 AM2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:00:22+5:30

शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळल्या श्वानांची संख्या गत काही वर्षांत प्रचंड वाढलेली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात नव्हे, तर जिल्ह्यात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांसह मॉर्निंग वॉककरिता जाणाºया विद्यार्थ्यांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे.

Dog bite of 7,119 citizens in the district | जिल्ह्यात ७ हजार ११९ नागरिकांना श्वानदंश

जिल्ह्यात ७ हजार ११९ नागरिकांना श्वानदंश

Next
ठळक मुद्दे१२ महिन्यांतील स्थिती : अनेकांना गमवावा लागला जीव

सुहास घनोकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात मागील वर्षभरापासून भटक्या श्वानांनी नागरिकांना वेठीस धरल्याचे चित्र आहे. त्यामुळे बेवारस श्वानांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील १२ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ७ हजार ११९ जणांना चावा घेतल्याचे शासकीय आकडेवारीतून स्पष्ट होते. हा शासकीय आकडा समस्येचे गांभीर्य दर्शविणारा आहे.
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळल्या श्वानांची संख्या गत काही वर्षांत प्रचंड वाढलेली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात नव्हे, तर जिल्ह्यात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांसह मॉर्निंग वॉककरिता जाणाºया विद्यार्थ्यांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालक आणि पादचाऱ्यांचा हे मोकाट श्वान पाठलाग करतात. यामुळे अपघात होऊन कित्येकांना अपंगत्वही आले आहे. सोबतच महामार्गावरही भटके श्वान आडवे जात असल्याने गंभीर अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मात्र, मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यास, त्यांच्या जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यास संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपंचायत प्रशासन अयशस्वी ठरले आहे.
एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या १२ महिन्यांत ७ हजार ११९ जणांना श्वानदंश झाला. यातील अनेकांना जीवही गमवावा लागला. आर्वी उपजिल्हा रुग्णालयात श्वानदंशाची ६४२ प्रकरणे दाखल झाली. भिडी ग्रामीण रुग्णालय २४०, पुलगाव ग्रामीण रुग्णालय-६५९, वडनेर ग्रामीण रुग्णालय १३३, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट- ७९४, कारंजा ग्रामीण रुग्णालय ६०३, समुद्रपूर ग्रामीण रुग्णालय-३६६, सेलू ग्रामीण रुग्णालय ९१४ तर वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल २ हजार ७६८ इतकी प्रकरणे दाखल झाली आहेत. ही संपूर्ण आकडेवारी शासकीय आहेत. अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातही उपचार घेतात. त्यामुळे श्वानदंशाचा आकडा ३० हजारांच्या जवळपास असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.

बळावताहेत कोरड्या खोकल्याचे आजार
जिल्ह्यात गत काही वर्षांपासून श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, संबंधित ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका प्रशासनाकडून याकडे डोळेझाक केली जाते. श्वानांच्या संख्यावाढीमुळे कोरड्या खोकल्यासह इतर आजार बळावत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जन्मदर नियंत्रणाला यंत्रणांची बगल
नगरपालिका, ग्रामपंचायती आणि नगरपंचायतींकडून आकारल्या जाणाºया स्वच्छता करात श्वानांचा जन्मदर नियंत्रित करण्याची बाबदेखील समाविष्ट आहे. संबंधित यंत्रणेकडे रीतसर नोंदणी केल्यानंतरच जनावरे पाळता येतात. तसा नियम आहे. मात्र, या नियमाला गोपालक, नागरिकांकडून सर्रास पायदळी तुडविले जाते. याकडे यंत्रणेकडूनही सपशेल दुर्लक्ष केले जाते. स्वच्छता करापोटी रक्कम मात्र वसूल केली जाते. श्वानांच्या जन्मदर नियंत्रणाला पद्धतशीरपणे बगल दिली जात आहे.

श्वान व इतर मोकाट जनावरांमुळे अस्वच्छता पसरते. यातूनच आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. नागरी वस्तीत जनावरांचा गोठाही बांधता येत नाही. तसा शासनाचा नियमही आहे. ‘स्वच्छ भारत’चा गाजावाजा केला जातो. मात्र, पालिकेकडून श्वानांचा जन्मदर नियंत्रित करण्याविषयी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे ‘स्वच्छ अभियाना’चे तीन-तेराच होत आहेत.
आशीष गोस्वामी, सचिव, पीपल फॉर अ‍ॅनिमल्स, वर्धा

मोकाट श्वानांमुळे रेबीज व इतर संसर्गजन्य आजार बळावतात. कुत्री कुठलेही पाणी पितात, विष्टा करतात. सोबतच विशिष्ट ऋतूमध्ये श्वानांवर गोचिड व इतर कीटक असतात. यामुळे जीवघेणे आजार उद्भवतात. या सर्व बाबींवर जन्मदर नियंत्रण हा एकमेव उपाय आहे.
डॉ. सचिन पावडे
बालरोगतज्ज्ञ तथा अध्यक्ष, व्हीजेएम, वर्धा

Web Title: Dog bite of 7,119 citizens in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा