दरोडेखोरांकडून देशी कट्टा व वाहन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:21 PM2018-02-21T23:21:53+5:302018-02-21T23:22:21+5:30
दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या नागपूर येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला आर्वी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून एक देशी कट्टा व वाहन जप्त करण्यात आले आहे.
ऑनलाईन लोकमत
आर्वी : दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या नागपूर येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला आर्वी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून एक देशी कट्टा व वाहन जप्त करण्यात आले आहे. आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अटकेतील आरोपींमध्ये रवी उर्फ माकड्या, रतन बोरकर, प्रज्वलित राज्यपाल मेश्राम रा. नागपूर, राकेश उर्फ देवगण गजानन महल्ले यांचा समावेश अआहे. पोलीस कोठडीमध्ये त्यांनी अनेक चोºयांची कबुली दिली आहे. यावरून हिंगणा नागपूर येथून चोरी केलेली दुचाकी चांदुर रेल्वे येथून १५ फेब्रुवारी रोजी जप्त करण्यात आली. विशाल रामचंद्र मानेकर, रा. जरीपटका नागपूर याच्याकडून एक देशी कट्टा व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत. प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मौराळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अशोक चौधरी व कर्मचारी करीत आहेत.
पिस्टल व काडतूस जप्त
संजय नगर परिसरात विशाल निरंजन भारती हे विनापरवाना पिस्टल बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून स्मशानभूमिसमोर हनुमान मंदिर मार्गावर विशालची दोन पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली. यात कमरेला खोचलेल्या पॅन्टमध्ये पिस्टल (माऊझर) व एक जिवंत काडतूस आढळले. कुठलाही परवाना नसल्याने पिस्टल, काडतूस व एक मोबाईलही जप्त करण्यात आला. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार चौधरी यांच्या मार्गदर्शनात पथक करीत आहे.