डॉ.आंबेडकरांचे सदैव ऋणी असले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:16 AM2019-02-03T00:16:50+5:302019-02-03T00:18:15+5:30
स्वतंत्र भारताचा राज्यकारभार चालविण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करण्याची सर्वस्वी जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेवून पार पाडली. व समस्त मूलनिवासी बहुजनांसह स्त्री वर्गाला समतेच्या प्रवाहात येण्यासाठी सर्व प्रकारचे मानवी हक्क बहाल केलेत त्यामुळे समस्या......
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्वतंत्र भारताचा राज्यकारभार चालविण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करण्याची सर्वस्वी जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेवून पार पाडली. व समस्त मूलनिवासी बहुजनांसह स्त्री वर्गाला समतेच्या प्रवाहात येण्यासाठी सर्व प्रकारचे मानवी हक्क बहाल केलेत त्यामुळे समस्या मुलनिवासी बहुजनांसह स्त्रीयांनी डॉ. आंबेडकरांचे सदैव ऋणी असले पाहिजे असे प्रतिपादन गृहरक्षक विभागाचे माजी केंद्रनायक सिध्दार्थ नगराळे यांनी केले.
महाराष्ट्र अंनिस राष्ट्र सेवा दल व अनेकांत स्वाध्याय यांचे विद्यमाने डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृतिप्रित्यर्थ ६६ वा अभ्यास वर्गात ते बोलत होते. यावेळी मंचावर अरूण चवडे, राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, राष्ट्र सेवा दल अध्यक्ष भागवत पोटदुखे, डॉ.रामकृष्ण मिरगे आदी उपस्थित होते. प्रारंभी संजय भगत यांनी क्रांतीगीत सादर केले. संचालन विक्की बिजवार, प्रास्ताविक सुनिल ढाले तर आभार प्रितेश म्हैसकर यांनी मानले.