डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचा बाप आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:08 AM2018-04-18T00:08:49+5:302018-04-18T00:08:49+5:30

गावातील ग्रा.पं. पासून तर संसदेत बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदानाचा हक्क प्रदान करणारे डॉ. आंबेडकर हे देशातील लोकशाहीचा बाप आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब यांच्या राज्यघटनेमुळे मी या देशाचा प्रधानमंत्री बनू शकलो, याची जाहीर वाच्यता नरेंद्र मोदी यांनी भाषणात केली आहे.

Dr. Babasaheb Ambedkar is the father of democracy | डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचा बाप आहे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचा बाप आहे

googlenewsNext
ठळक मुद्देजोगेंद्र कवाडे : बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : गावातील ग्रा.पं. पासून तर संसदेत बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदानाचा हक्क प्रदान करणारे डॉ. आंबेडकर हे देशातील लोकशाहीचा बाप आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब यांच्या राज्यघटनेमुळे मी या देशाचा प्रधानमंत्री बनू शकलो, याची जाहीर वाच्यता नरेंद्र मोदी यांनी भाषणात केली आहे. एकीकडे प्रधानमंत्री असे बोलत आहे तर दुसरीकडे त्यांचे सहकारी मंत्री राज्यघटना बदलण्याबाबत बोलून समाजात दुफळी माजविण्याचे काम करीत आहे, असे मत लाँग मार्चचे प्रणेते आ.प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले.
नगर परिषद व डॉ. आंबेडकर जयंती महोत्सवाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत आहे. अध्यक्षस्थानी आमदार रणजीत कांबळे तर अतिथी म्हणून न.प. सदस्य गौतम पोपटकर, सुनील बासू, पवन महाजन, सुरेश वैद्य, अश्विनी काकडे, मोहन अग्रवाल, दादा मून, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक गजानन दराडे आदी उपस्थित होते.
प्रा. कवाडे पूढे म्हणाले की, बहुजन समाजातील थोर समाजसेवक व उच्च कोटीच्या संतांना त्यांच्या जातीपुरते मर्यादित ठेवण्याचे महापाप आजच्या समाजव्यवस्थेत होत आहे. या देशात उपेक्षित ठरलेल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी डॉ. आंबेडकर यांचे कार्य राहिले आहे. राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी समस्त समाज व्यवस्थेचा उद्धार केला आहे. असे असताना त्यांना दलितांचा नेता म्हणून मर्यादित ठेवण्यामागे मनुवादी प्रवृतीचे षडयंत्र आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
सर्वप्रथम मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन केले. संचालन प्रशांत चहारे यांनी केले तर आभार अंशुल कांबळे यांनी मानले. याप्रसंगी भिमा कोरेगाव शौर्यस्तंभाच्या उभारणीसाठी आर्थिक सहभाग देणारे गौतम पोपटकर, दादा मून, नगराळे, भगत व इतरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दुनिया मे भिमजी महान हा भिमगीतांचा कार्यक्रम मिलिंद जाधव व जाधव सिस्टर्स यांनी सादर केला. कार्यक्रमाला महेंद्र खंताडे, सम्राट भगत, राष्ट्रपाल पोपटकर, प्रमोद कांबळे व नागरिक उपस्थित होते.
डॉ. आंबेडकर हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ -रणजीत कांबळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ होते. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सर्वधर्म समभावातून समस्त समाज व्यवस्थेला प्रेरणा देणारे ते महामानव होते. बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळेच विशाल देशातील लोकशाही मजबूत मानली गेली आहे. यामुळे बाबासाहेबांचे विचार सर्व समाज बांधवांनी आत्मसात करणे गरजेचे आहे, असे मत आ. रणजीत कांबळे यांनी व्यक्त केले.

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar is the father of democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.