डॉ. आंबेडकरांचा जयजयकार करण्यापेक्षा अनुकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:24 PM2018-01-31T23:24:07+5:302018-01-31T23:24:37+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य कोण्या एका जातीपुरते मर्यादित नसून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचे आहे. त्यांचा जयजयकार करण्यापेक्षा अनुकरण करा. त्यांचे विचार डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या.

Dr. Follow imitation of Ambedkar | डॉ. आंबेडकरांचा जयजयकार करण्यापेक्षा अनुकरण करा

डॉ. आंबेडकरांचा जयजयकार करण्यापेक्षा अनुकरण करा

Next
ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बौद्धधम्म परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य कोण्या एका जातीपुरते मर्यादित नसून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचे आहे. त्यांचा जयजयकार करण्यापेक्षा अनुकरण करा. त्यांचे विचार डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या. बाबासाहेबांचे विचार या देशातील सर्व समाजापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संपूर्ण आंबेडकरी अनुयायाची आहे, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर मुंबई यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे भदन्त राजरत्नद्वारे आयोजित बौद्ध धम्म परिषदेत ते बोलत होते. धम्म विचार मंचावर परिषदेचे अध्यक्ष भदन्त आनंद महाथेरो दिल्ली, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. मुन्नी भारती, दिल्ली परिषदेचे उद्घाटक प्राचार्य डॉ. राजकुमार शेंडे, अनिल जवादे हिंगणघाट, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. सरोज आगलावे, डॉ. शुभाष खंडारे, डॉ. सुधाकर सोनोने, प्राचार्य डॉ. सुनील तोतडे, निरज गुजर, नयन सोनवणे, अविनाश पाटील, उमेश म्हैसकर, किशोर खैरकार, अजय मेहरा, रूपचंद भगत, गजानन दिघाडे, धर्मपाल ताकसांडे, गोरख भगत, सुरेश उमरे, महेंद्र कांबळे, संजय कांबळे, सरला भिमटे, दीपचंद घनमोडे, भिक्खू व भिक्खूनी संघ उपस्थित होते.
उद्घाटन सत्रात समाजसेवक सुहास थूल व विशाल मानकर यांचा भदन्त आनंद महाथेरो दिल्ली यांच्या हस्ते तथागत बुद्ध मूर्ती, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह शाल देऊन करण्यात आला. सायंकाळी कृतिका बोरकर व रसिका बोरकर मुंबई यांचा भीम-बुद्ध गितांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. परिषदेला दहा हजार पेक्षा अधिक समाज बांधव उपस्थित होते.
प्रास्ताविक आयोजक भदन्त राजरत्न यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सुनील ढाले यांनी केले तर आभार मुकूंद नाखले यांनी मानले. परिषदेला गौतम पानतावणे, नितीन जुमडे, सचिन माटे, किशोर कांबळे, वंदना पाटील, रेखा सोनवणे, निरज ताकसांडे, सीतम मंदरेले, ताराचंद पाटील, सचिन थूल, अमित देशभ्रतार, निलेश ओंकार, आकाश चतुरपाळे आदींनी सहकार्य केले.
बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच समाजाकरिता महत्त्वाचे कार्य केलेले आहे. यामुळे बाबासाहेबांचा केवळ जयजयकार करून चालणार नाही तर त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, अशी मते बौद्ध धम्म परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केली. परिषदेला उपस्थित असंख्य समाज बांधवांनीही यास प्रतिसाद देत संकल्प केला.

Web Title: Dr. Follow imitation of Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.