डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी मार्च महिन्याचे वेतन द्या

By admin | Published: March 24, 2017 01:54 AM2017-03-24T01:54:08+5:302017-03-24T01:54:08+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी शिक्षकांना मार्च महिन्याचे वेतन देण्यात यावे. तसेच सेलू व हिंगणघाट

Dr. Pay the wages of the month before the Ambedkar Jayanti | डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी मार्च महिन्याचे वेतन द्या

डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी मार्च महिन्याचे वेतन द्या

Next

शिक्षकांची मागणी : सीईओंना निवेदनातून साकडे
वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी शिक्षकांना मार्च महिन्याचे वेतन देण्यात यावे. तसेच सेलू व हिंगणघाट तालुक्यातील शिक्षकांचा फेब्रुवारी महिन्याचा प्रश्न निकाली काढावा, शिक्षकांना अतिरिक्त होण्यापासून रोखण्याकरिता पदोन्नती करण्यात यावी, अशी मागणी स्वतंत्र समता शिक्षक संघाने मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे आणि शिक्षणाधिकारी शेंंडे यांना निवेदनातून केली केली आहे.
यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. वेळेवर वेतन देण्यासाठी प्रशासन कटीबद्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. या चर्चेत विषय शिक्षकांची पदभरती बदल्यांपूर्वी करावी. बिंदु नामावली शिक्षकांसमोर आक्षेपास ठेवून अंतिम स्वरुप देण्यात यावे. चटोपाध्याय व निवडश्रेणी प्रक्रीया गतिमान करण्यात यावी. जीपीएफच्या पावत्या देण्यात याव्या, यावर चर्चा केली. बदल्या करताना पारदर्शकता ठेवावी. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळण्यासाठी बजेटमध्ये तरतुद करावी. आदिवासी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होईल, यासाठी प्रयत्न करावे. पं.स. शिक्षण विभागात कर्तव्यप्रिय अधीक्षक व कर्मचारी नियुक्त करावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष सुनील तेलतुंबडे, सरचिटणीस गौतम पाटील, दिलीप वावरे, धर्मेंद्र अंबादे, सुरेश सांगोले, महेंद्र आडे, अविनाश कांबळे, हिंगणघाटचे पुष्पराज झिलटे, प्रयोग तेलंग, सचिन शंभरकर, प्रमोद गावंडे, सुरेश ताजने, विक्रम तामगाडगे, राजू मून, सुभाष लोहकरे, राजकुमार मून, सुभाष ताकसांडे, प्रकाश पखाले यांचा समावेश आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Dr. Pay the wages of the month before the Ambedkar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.