डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावा
By Admin | Published: June 26, 2017 12:41 AM2017-06-26T00:41:12+5:302017-06-26T00:41:12+5:30
संभाव्य धोका टाळण्यासाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावण्यात यावी,
मागणी : निवेदनातून न.प. मुख्याधिकाऱ्यांना साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : संभाव्य धोका टाळण्यासाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावण्यात यावी, अशी मागणी न. प. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनातून, २०१५-१६ मध्ये काही समाज कंठकांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. त्यामुळे पुन्हा असा प्रकार पुढे घडू नये म्हणून डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावावे व कायमस्वरुपी दोन शिपाई येथे नेमावे, अशी मागणी ३० मे २०१६ ला जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. त्यानंतर ५ एप्रिल २०१७ ला समता सैनिक दलातर्फे याच मागणीचे स्मरणपत्र सुद्धा देण्यात आले. परंतु, अद्यापही मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार झालेला नाही. तसेच सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्याचा सुरूवात झालेली नाही. डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात त्वरित सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना अभय कुंभारे, जोत्सना रामटेके, अरविंद कांबळे, प्रशांत मेश्राम, मनिष शंभरकर, गौरव नंदागवळी, हर्ष बोधीले, अनुराग नंदागवळी आदी उपस्थित होते.