वर्ध्यातील डॉ. सुमित मेश्राम कॅनडा इंटरनॅशनल क्रिकेट टीमचे फिजिओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:02 PM2019-04-22T23:02:53+5:302019-04-22T23:03:53+5:30
क्रिकेट खेळ खेळताना अनेकदा दुखापतीला समोर जावे लागते. यामुळे टीम कुठलीही असो तुमच्या प्रत्यके खेळाडूची स्वास्थ्य महत्वाचे. याचीच कॅनडा इंटरनॅशनल क्रिकेटटीमचे फिजिओ म्हणून वर्ध्यातील डॉ. सुमित मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे.
वर्धा - क्रिकेट खेळ खेळताना अनेकदा दुखापतीला समोर जावे लागते. यामुळे टीम कुठलीही असो तुमच्या प्रत्यके खेळाडूची स्वास्थ्य महत्वाचे. याचीच कॅनडा इंटरनॅशनल क्रिकेटटीमचे फिजिओ म्हणून वर्ध्यातील डॉ. सुमित मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. सुमित मेश्राम हे मागील अनेक दिवसांपासून फिजिओ म्हणून काम सांभाळत आहे. सध्या डॉ. सुमित मेश्राम हे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) साठी कार्यरत आहेत. या निवडीनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेली मोठी झेप आहे. डॉ. सुमित मेश्राम यांनीं सावंगी मेघे आयुर्विज्ञान संस्था येथील रवि नायर फिजिओथेरपी कॉलेजला शिक्षण घेतले. क्रिकेटची आवड असल्याने स्वावलंबी मैदानावर खेळ खेळताना फिजिओ म्हणून करियर निवडले. खेळातील आवड असल्याने क्रिकेट खेळून असल्याने अनेक बारकावे अगोदरच माहीत आहे. याचाच फायदा फिजिओ म्हणून इतरांना मिळत आहे.
ब्रदरहुड क्रिकेट क्लब वर्धा जिल्हाच क्रिकेटपटू म्हणून अनेक वर्ष प्रतिनिधित्व केल्यानंतर आंतरराषट्रिय क्रिकेट टीम साठी फिजिओ म्हणून निवड होणे वर्धा जिल्हा साठी नक्कीच गौरवाची बाब आहे. मार्च महिन्यात श्रीलंका मध्ये प्रॅक्टिस टूर सुरू असताना त्यांचा कौशल्य पाहून डॉ. सुमित मेश्राम यांची नियुक्ती झाली. दक्षिण आफ्रिकेला प्रॅक्टिस मॅचेस संपातच त्यानंतर नामिबियाला आईसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिविजन २ च्या मॅचेससाठी ते कॅनडा टीमचे फिझिओ म्हणून भार सांभाळणार. नमिबियाला होणाऱ्या आईसीसीच्या इव्हेंट २०२३ मध्ये होणारा क्रिकेट वर्ल्ड कप क्वलिफायरचा हा भाग आहे.
या मॅचेस मध्ये जर टीम क्वालिफाय झाली तर कॅनडा टीमला पुढच्या २ वर्षात आयसीसीच्या अनेक मॅचेस खेळायला मिळतील. त्यामुळे फिजिओ म्हणून खेळाडूंचे फिटनेस टिकवून ठेवण्याची मोठी जवाबदारी आहे. २०२३ च्या विश्वकप साठी पुढच्या टप्प्यात क्वालीफायर राऊंड खेळता येईल. आजचा क्रिकेट उच्च स्तर वर असून स्पर्धा वाढली आहे.
टीममध्ये फिजिओचे जवाबदारी?
खेळ म्हटल की दुखापती आल्या म्हणून एक फीजिओ म्हणून खेळाडूचे फिटनेस, वर्क लोड मॉनिटर करणे, त्यांना दुखापती पासून वाचवण्याचे उपाय हे फार म्हत्वाजे समजले जाते. तसेच दुखापती झाल्यावर उपचार हे सर्व भार फिझियोवर असतात. एक दुर्लक्षित दुखापत किंवा जखम खेळाडूचे पूर्ण करिअर बरबाद करू शकते. म्हणूनच फिजिओ म्हणून काम अतिशय जबाबदारीचा असल्याचे डॉ सुमित मेश्राम सांगतात.