वणा नदीला घाणीचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:50 PM2018-04-16T23:50:10+5:302018-04-16T23:50:10+5:30
गाव शहरातून नदीत मिळणारे दूषित पाणी, त्यात येत असलेला कचरा व रेती माफियांकडून नदीपात्रात झालेले खड्डे आणि पात्रात वाढलेली जलपर्णी यामुळे नदीचे स्वास्थ धोक्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : गाव शहरातून नदीत मिळणारे दूषित पाणी, त्यात येत असलेला कचरा व रेती माफियांकडून नदीपात्रात झालेले खड्डे आणि पात्रात वाढलेली जलपर्णी यामुळे नदीचे स्वास्थ धोक्यात आले आहे. अशीच अवस्था हिंगणघाट येथील वणा नदीची झाली आहे. या नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात कचरा दिसत आहे. शिवाय या कचऱ्यामुळे नदीचे पाणीही दूषित झाल्याचे दिसत आहे. यामुळे शासनाने नदी स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी होत आहे.
हिंगणघाट तालुक्याची जीवनदायीन असलेल्या या वणा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याचे दिसत आहे. पाण्यात शहरातून येत असलेल्या नाल्याचे दूषित पाणी येत असल्याने त्याची दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नदीपात्राकडे गेल्यास येणाºया दुर्गंधीमुळे ही नदी की विस्तारीत झालेला नाला याचा अंदाज घेणे कठीण होते. यामुळे हिंगणघाट प्रशासनाने या नदीची स्वच्छता करण्याची गरज आहे. वर्धेत मध्यंतरी नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच अभियाने येथे राबवून वणा नदी स्वच्छ करण्याची गरज आहे. या संदर्भात जिल्हाधिकाºयांनी लक्ष देत येथे कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रेती माफियांमुळे पात्रात खड्डे
जिल्ह्यात अवैध रेती उपसा जोरात सुरू आहे. याला जिल्हा प्रशासनाकडून मोठे पाठबळ मिळत असल्याचे अनेकवार समोर आले आहे. याच रेती माफियांकडून रेती उपस्याकरिता येथे खड्डे करण्यात आले आहे. या खड्ड्यात आता पाणी साचून राहत असून त्यात अडलेल्या कचऱ्यांमुळे दुर्गंधी पसरत आहे. अशाच खड्ड्यात बुडून गत दोन वर्षांपूर्वी दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना आहे. यामुळे नदी पात्रात पडलेले खड्डे धोक्याचे ठरत आहे. याच नदीत नाही तर वर्धा जिल्ह्यातील अनेक नदीत असे खड्डे पडले आहेत. ते बुजविण्याकरिता काही उपाययोजना आखण्याची गरज आहे. शिवाय हिंगणघाट शहरातील सामाजिक संघटनांनीही एकत्र येत आपल्या शहरातील नदीपात्र स्वच्छ करण्याची जबाबदारी उचलण्याची गरज आहे.
शहरातील दूषित पाणी नदीपात्रात
हिंगणघाट शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. शिवाय या तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहे. या उद्योगातील आणि शहरातील मोठ्या नाल्यातील पाणी दूषित पाणी या नदीच्या पात्रात येत आहे. यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. यामुळे नगर परिषदेने शहरातील पाणी नदीत येणार नाही या याकरिता काही उपाय योजना आखण्याची गरज आहे.
नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा असल्याचे दिसून आले आहे. हा कचरा नदी शेजारी असलेल्या गावांतील नागरिकांकडून टाकण्यात आल्याचे दिसत आहे. या कचºयामुळे नदीचे पात्र दूषित होत आहे. हा परिसर स्वच्छ करण्याकरिता येथील पर्यावरणवादी संघटनांनी एकत्र येत कार्य करण्याची गरज येथे निर्माण झाली आहे.