जलयुक्त शिवारात नाला खोलीकरण

By Admin | Published: July 7, 2016 02:16 AM2016-07-07T02:16:47+5:302016-07-07T02:16:47+5:30

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मदनी (आमगाव) येथे सिमेंट नाला बांधकाम व नाला खोलीकरण करण्यात आले.

Draining of drainage in water tank | जलयुक्त शिवारात नाला खोलीकरण

जलयुक्त शिवारात नाला खोलीकरण

googlenewsNext

मदनी येथे उपक्रम : चित्ररथातून वृक्षलागवडीचा संदेश
सेलू : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मदनी (आमगाव) येथे सिमेंट नाला बांधकाम व नाला खोलीकरण करण्यात आले. या बांधावर आमदार डॉ. पंकज भोयर यांचे हस्ते वृक्षलागवड व जलपूजन करण्यात आले. तसेच चित्ररथाला मान्यवरांचे हस्ते हिरवी झेंडी देण्यात आली.
या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, तालुका कृषी अधिकारी बी.के. वाघमारे, पंचायत समिती सदस्य अशोक कलोडे, सरपंच प्रणाली गौळकर, मंडळ कृषी अधिकारी एल.एच. सोमनकर, कृषी पर्यवेक्षक किशोर वऱ्हाडे, कृषी सहायक विजय खोडे, अभय ढोकणे तसेच शेतकरी बांधव व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील गोंदापूर, आर्वी (लहान), परसोडी या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या कामाचे मान्यवरांचे उद्घाटन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी, सेलू कार्यालयाच्यावतीने कर्मचाऱ्यांकडून वृक्षरोपण केले जात आहे.(तालुका प्रतिनिधी)
आरती चौक ते धुनिवाले चौकापर्यंत मार्गाची गिट्टी उखडली
वर्धा : पावसामुळे आरती चौक ते धुनिवाले मठापर्यंत रस्त्याची गिट्टी उखडली आहे. यामुळे या मार्गावर दुचाकी वाहने चालविताना कमालीची कसरत करावी लागते. अशातच वाहन घसरल्यामुळे अपघाताची भीती बळावली आहे.याकडे लक्ष देण्याची गरज आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Draining of drainage in water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.