मद्य प्राशन करून, बेफामपणे वाहन चालविणे पडेल महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 05:00 AM2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:25+5:30

चैतन्य जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वेगाने अन् मद्य प्राशन करून वाहन चालवित असाल तर सावधान! शहर ...

Drinking alcohol, driving recklessly will cost dearly | मद्य प्राशन करून, बेफामपणे वाहन चालविणे पडेल महागात

मद्य प्राशन करून, बेफामपणे वाहन चालविणे पडेल महागात

Next
ठळक मुद्देदोन अत्याधुनिक वाहने दाखल : वाहतूक पोलीस विभाग झाला ‘हायटेक’

चैतन्य जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वेगाने अन् मद्य प्राशन करून वाहन चालवित असाल तर सावधान!
शहर वाहतूक विभागात या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. इर्टिगा कंपनीच्या या दोन वाहनांमध्ये फिक्स टेबल अटॅच वुईथ स्पीडगन मशीन, डी. डी. मशीन आणि जीपीआरएस कनेक्टिव्हिटीची व्यवस्था आहे. यामुळे बेफामपणे शिवाय मद्य प्राशन करून वाहन चालविणे चांगलेच महागात पडणार आहे.
शहरात अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करीत असले तरी मोजक्या चालकांच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. यावर प्रतिबंध म्हणून आणि दोषी वाहनचालकांवर कारवाई व्हावी, म्हणून ही दोन वाहने महत्त्वाची भूमिका बजावरणार आहेत.
या दोन वाहनांमध्ये असलेली फिक्स टेबल अटॅच वुईथ स्पीडगन मशीन ही वेगाशी स्पर्धा करणाऱ्या वाहनचालकांना अचूक वेधून कारवाई करू शकतील. उल्लेखनीय म्हणजे, ५०० मीटरपर्यंतच्या वाहनचालकावर कारवाई करणे शक्य होणार आहे. तसेच या वाहनातील डी.डी. मशीन म्हणजे 'ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह' दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी या मशीनचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर जीपीआरएस कनेक्टिव्हिटी असलेले संयंत्रही वाहतूक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर लक्ष ठेवणार आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे तसेच शहर वाहतूक ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांच्या प्रयत्नाने शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्यात मोलाची मदत होणार आहे. संपूर्ण शहरात ही दोन्ही वाहने पेट्रोलिंग करणार असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे.

वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही असेल ‘वॉच’
या वाहनात जीपीआरएस कनेक्टिव्हिटीची व्यवस्था एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. वाहतूक पोलिस हे वाहन घेऊन गस्तीवर जातील तेव्हा ते कुठे आहेत आणि काय करीत आहेत ? याची माहितीदेखील वाहतूक शाखेच्या कार्यालयाकडे असणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे वाहन अडगळीत उभे करून आराम करण्याचे दिवस आता संपले आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांनाही सतर्क असावे लागणार आहे. याशिवाय कुठेही वाहतूक कारवाई करावयाची असल्यास या वाहनातील पोलिसांशी संपर्क करून त्यांना तत्काळ घटनास्थळी पाठविण्याची व्यवस्था या सिस्टीममध्ये आहे.

'स्पीड गन कार'ची वैशिष्ट्ये
स्पीड गन कारमध्ये लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन, ई-चलन, ब्रिथ अ‍ॅनालायझर समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करणे वाहतूक शाखेला सोपे होणार आहे. या वाहनात रस्त्यावर भरधाव वेगाने येणारी वाहने, चारचाकी वाहनात काळी फिल्म लावणाºयांवर स्पीडगन यंत्राच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे. एखादे वाहन वेगमर्यादेचे उल्लंघन करून पळाल्यास ३०० मीटरपर्यंत लांब असलेल्या वाहनाचा क्रमांकसुद्धा टिपता येणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्याविरुद्ध कारवाईसाठी एक ब्रिथ अ‍ॅनालायझरही या कारमध्ये आहे. ही कार स्वयंचलित असून, नियमाचे उल्लंघन करणारयांना थेट मोबाइलवर नोटीस पाठविली जाणार आहे. जिल्ह्यात दाखल झालल्या दोन स्पीड गन वाहनांपैकी एक जिल्हा वाहतूक शाखा आणि दुसरे जाम रोड महामार्ग चौकीला देण्यात आले आहे.

Web Title: Drinking alcohol, driving recklessly will cost dearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.