पिण्याचे पाणी अस्वच्छच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 09:54 PM2018-11-03T21:54:21+5:302018-11-03T21:55:01+5:30
यशोदा नदीच्या पत्रातील विहिरीतून अल्लीपूर येथील नळ योजनेसाठी पाण्याची उचल केली जाते. त्या पाण्याला स्वच्छ करून त्याचा पुरवठा नागरिकांना केल्या जातो. परंतु, सध्या पाणी स्वच्छतेबाबतची कुठलीही प्रक्रिया न करता पाण्याचा थेट पाणी पुरवठा नागरिकांना केल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : यशोदा नदीच्या पत्रातील विहिरीतून अल्लीपूर येथील नळ योजनेसाठी पाण्याची उचल केली जाते. त्या पाण्याला स्वच्छ करून त्याचा पुरवठा नागरिकांना केल्या जातो. परंतु, सध्या पाणी स्वच्छतेबाबतची कुठलीही प्रक्रिया न करता पाण्याचा थेट पाणी पुरवठा नागरिकांना केल्या जात आहे. शिवाय पिवळसर पाणी नळातून येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
सध्या नळाला येत असलेली पाणी पिवळे आहे. शिवाय पाण्याचा दुर्गंधही येत असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे गावातील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून हा दुर्लक्षी प्रकार एखाद्या रोगराईला आमंत्रण देणारा ठरत आहे. भूगावच्या कारखान्यातील पाणी याच नदीत सोडले जात असल्याने ही परिस्थिती ओढावल्याची ओरड परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार करूनही ते तसेच जीवन प्राधिकारणच्या अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष देत संबंधित अधिकाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुजान नागरिकांची आहे.