पाणी बचतीचे महत्त्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:28 PM2018-03-19T22:28:38+5:302018-03-19T22:28:38+5:30

पाणी बचत ही काळाची गरज आहे. भावी पिढीला समृद्ध करण्यास्तव आजपासून पाणी बचतीचे महत्त्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

Drive the importance of saving water to every citizen | पाणी बचतीचे महत्त्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावे

पाणी बचतीचे महत्त्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावे

googlenewsNext
ठळक मुद्देशैलेश नवाल : जलजागृती सप्ताहास प्रारंभ

आॅनलाईन लोकमत
वर्धा : पाणी बचत ही काळाची गरज आहे. भावी पिढीला समृद्ध करण्यास्तव आजपासून पाणी बचतीचे महत्त्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर व निम्न वर्धा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी तर अतिथी म्हणून निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दि.घ. बारापात्रे, वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्यामसुंदर काळे, कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, बजाज अभियांत्रिकी महा.चे प्राचार्य कान्हे, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पूढे म्हणाले की, महात्मा गांधींचे स्वप्न होते, ‘गावाकडे चला’. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेडी समृद्ध झाली तर नागरिक समृद्ध होतील. यामुळे शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी त्यांच्या शेतीला सिंचन सुविधा देणे महत्त्वाचे आहे. सिंचनासाठी पाणी बचतीचे महत्त्व पटवून काटकसर करणे तेवढेच गरजेचे आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला खोलीकरणाची अधिकाधिक कामे घेण्यात येत आहे. यामुळे शेतकºयांना अधिक प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
पाणी वापर सहकारी संस्थांनी केवळ संस्था नोंदणी न करता शेतकºयांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य करावे. शेतकºयांनी नगदी पिकांची शेती करावी. नागरिकांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी वापरण्यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील सिंचनाखालील क्षेत्र वाढविण्याची गरज असल्याचे मत जयंत गवळी यांनी व्यक्त केले. सुक्ष्मसिंचन योजनेसाठी शेतकºयांना अनुदानावर शेती साहित्य देण्यात येणार आहे. यासाठी शेतकºयांनी सुक्ष्मसिंचन शेती करावी, असे आवाहनही गवळी यांनी केले.
केवळ दिन वा सप्ताह साजरा करून चालणार नाही तर कृती करणे गरजेचे आहे. पाण्याचे संवर्धन करणे, ही काळाची गरज आहे. पाणी बचत ही चळवळ व्हावी. पाणी बचतीसाठी शोषखड्ड्यांची पुरातन कल्पना आज नागरिकांनी अंमलात आणण्याची गरज आहे, असे बेलखोडे यांनी सांगितले. याप्रसंगी कान्हे, पाटील यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपविभागीय अभियंता विश्वजित लुथडे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Drive the importance of saving water to every citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.