१३४ व्यक्तींना परदेशात वाहन चालविण्याचा परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 05:00 AM2021-07-07T05:00:00+5:302021-07-07T05:00:07+5:30

शिक्षण आणि नोकरीच्या कारणामुळे अनेक व्यक्ती विदेशात जातात. यापैकी काही व्यक्ती इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे रीतसर आवेदन सादर करतात. याच आवेदकांची प्रकरणे सध्या अवघ्या ७२ तासांत निकाली काढून विदेशात जाणाऱ्यांना व रीतसर इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त करू इच्छिणाऱ्यांना परदेशातही वाहन चालविण्याचा परवाना दिला जात आहे.

Driving license for 134 persons abroad | १३४ व्यक्तींना परदेशात वाहन चालविण्याचा परवाना

१३४ व्यक्तींना परदेशात वाहन चालविण्याचा परवाना

googlenewsNext
ठळक मुद्दे७२ तासांत आवेदन काढले जातेय निकाली

महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने मागील दहा वर्षे तीन महिन्यांत तब्बल १३४ व्यक्तींना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स दिले आहे. त्यामुळे या व्यक्तींना परदेशातही वाहतुकीचे नियम पाळत वाहन चालविण्याची मुभा मिळाली आहे. शिक्षण आणि नोकरीच्या कारणामुळे अनेक व्यक्ती विदेशात जातात. यापैकी काही व्यक्ती इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे रीतसर आवेदन सादर करतात. याच आवेदकांची प्रकरणे सध्या अवघ्या ७२ तासांत निकाली काढून विदेशात जाणाऱ्यांना व रीतसर इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त करू इच्छिणाऱ्यांना परदेशातही वाहन चालविण्याचा परवाना दिला जात आहे. मागील दहा वर्षे तीन महिन्यांत वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने तब्बल १३४ व्यक्तींना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स दिले असून सर्वाधिक इंटरनॅशनल लायसन्स सन २०१६-१७ व २०१२-१३ मध्ये देण्यात आली आहेत.

आवेदनासोबत हवी ही कागदपत्रे 
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवेदन करताना आवेदकाला विहित नमुन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून आवेदनासोबत भारतीय व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, व्हिसा आदी कागदपत्राची झेरॉक्स प्रत जोडणे गरजेचे आहे.

एक वर्षाची राहते मुदत
रीतसर आवेदन सादर करून इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स मिळविणाऱ्यांची प्रकरणे अवघ्या ७२ तासांत निकाली काढली जात असून या लायसन्सचा कालावधी एक वर्षांचा राहत असल्याचे सांगण्यात आले. तर त्यानंतर हे लायसन्स रिनिव्हल करता येते.

पूर्वी स्वीकारले जायचे ऑफलाइन अर्ज
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जायचे; पण आता शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून ऑनलाइन पद्धतीने आवेदन स्वीकारले जात आहेत. आवेदकाला कुठलीही अडचण येत असल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी त्यांना योग्य मार्गदर्शन करीत असल्याचे चित्र बघावयास मिळते.

मागील दहा वर्षे तीन महिन्यांच्या काळात १३४ व्यक्तींना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे प्राप्त झालेली इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची प्रकरणे जास्तीत जास्त ७२ तासांत निकाली काढली जात आहे.
- विजय तिराणकर, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.
 

Web Title: Driving license for 134 persons abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.