ड्रायपोर्टमुळे लोकांना रोजगार मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 11:36 PM2019-04-07T23:36:07+5:302019-04-07T23:36:45+5:30

राज्यात पाच लाख बेघरांना घरे दिली. देशात २०२४ पर्यंत एकही बेघर राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. मुद्रा योजनेत १३ कोटी लोकांना कर्ज दिले. शिवाय रोजगार निर्माण केला. श्रमेव जयते योजनेत ६० वर्षांवरील कामगारांना तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे.

Driving, people will get jobs | ड्रायपोर्टमुळे लोकांना रोजगार मिळेल

ड्रायपोर्टमुळे लोकांना रोजगार मिळेल

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : हिंगणघाट येथील जाहीर सभा, काँग्रेसवर डागली तोफ

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : राज्यात पाच लाख बेघरांना घरे दिली. देशात २०२४ पर्यंत एकही बेघर राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. मुद्रा योजनेत १३ कोटी लोकांना कर्ज दिले. शिवाय रोजगार निर्माण केला. श्रमेव जयते योजनेत ६० वर्षांवरील कामगारांना तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. सात बारा कोरा होईपर्यंत कर्ज माफी योजना थांबविण्यात येणार नाही. इतकेच नव्हे तर सिदी रेल्वे येथील ड्रायपोर्टमुळे पुढील दहा वर्षांत ५० हजार लोकाना रोजगार निर्मिती होत अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ते भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ गोकुलधाम मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार अशोक शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश सराफ, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अभिनंदन मुनोत, शिवसेना शहर प्रमुख मुन्ना त्रिवेदी, समुद्र्रपूर पं.स. सभापती कांचन मडकाम, पं. स. सभापती गंगाधर कोल्हे, डॉ. शिरीष गोडे, नगराध्यक्ष प्रेम बसतांनी रिपाइंचे विजय आगलावे, मुस्लिम आघाडीचे बिस्मिल्ला खाँ आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, ही निवडणूक देशाचे भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हाती द्यायचे, देशात विकास व सुरक्षा कोण देऊ शकतो याचा निर्णय घेणारी आहे. त्यामुळेच देशाचा स्वाभिमान आणि अभिमान कायम ठेऊन आन-बाण-शान कायम ठेवण्यासाठी भाजपा आघाडीला भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवर कडाडून टीका करीत केंद्र व राज्यातील भाजपाने सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, माजी आमदार अशोक शिंदे, रिपाइंचे विजय आगलावे, शिवसेनेचे राजेश सराफ यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन किशोर दिघे व राकेश शर्मा यांनी केले.

राहुल गांधींचे भाषण काल्पनिक पात्राप्रमाणे
काँग्रेसने देशाची वाट लावली आहे. काँग्रेसने गरिबी हटावचा नारा पणजोबा, आजी, वडील व आई यांनी सातत्याने जाहिरनाम्यातून दिला, तोच नारा आज राहुल गांधी देत आहेत. गरिबी तर हटली नाही; पण काँग्रेस पक्षातील नेते व त्यांचे चेले चपाट्यांची गरिबी हटली. या उलट मोदीजी हे सातत्याने गरीबी नष्ट करण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी यांची भाषणे मनोरंजन करणारी असून टीव्ही मालिकेतील काल्पनिक पात्राप्रमाणे असतात, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ईएसआयसी योजनेचा १५ हजार कामगारांना फायदा - कुणावार
७६८ कोटी रुपायांच्या योजना आपण चार वर्षात आणल्या. मी जी योजना या मतदार संघासाठी मागितल्या त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला झाला. नझुल जागा, ग्रामीण भागातील अतिक्रमण पट्टे मंजूर, कामगार यांना ईएसआयसी योजनेचा १५ हजार कामगारांना फायदा झाला. समाधान शिबीर अंतर्गत वर्ग २ ची जमीन १ करणे, टेक्सटाईल्स पार्क मध्ये ३०० कोटी रुपये निवेश असून १ हजार २०० लोकांना रोजगार मिळाल्याचे यावेळी आ. समीर कुणावार यांनी सांगितले. या जाहीर सभेदरम्यान माजी आमदार अशोक शिंदे यांच्यासह आदींनीही मार्गदर्शन केले.

Web Title: Driving, people will get jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.