मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी हवी औषधी विक्रेत्यांची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:00 AM2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:00:34+5:30
असले तरी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाला औषधी विके्रत्यांची साथ मिळाल्यास नक्कीच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मदत होणार आहे. चंद्रपूर येथे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला तेथील औषधी विक्रेत्यांनी साथ मिळाली आहे. तशीच साथ वर्ध्यातही मिळावी अशी अनेकांना अपेक्षा आहे; पण ‘पहिले आप’मध्ये सध्या संवाद अडकला असल्याचे दिसून येत आहे.
महेश सायखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम झाली. परंतु, त्यावेळी पाहिजे तसा मतदानाचा टक्का वाढला नाही. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. मात्र, विविध संघटनांकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याचे वास्तव आहे. असे असले तरी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाला औषधी विके्रत्यांची साथ मिळाल्यास नक्कीच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मदत होणार आहे. चंद्रपूर येथे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला तेथील औषधी विक्रेत्यांनी साथ मिळाली आहे. तशीच साथ वर्ध्यातही मिळावी अशी अनेकांना अपेक्षा आहे; पण ‘पहिले आप’मध्ये सध्या संवाद अडकला असल्याचे दिसून येत आहे.
वर्धा जिल्ह्यात एकूण ५७५ मेडिकल शॉप आहेत. तर सुमारे १५ जेनेरिक औषधी विक्री केंद्रे आहेत. हे सर्व औषधी विक्रेता एका असोसिएशनच्या माध्यमातून एकजूटही आहेत. जिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये औषधी विक्रेत्यांचे चांगले जाळे आहे. औषधी विक्रीच्या माध्यमातून त्यांचा अनेक नागरिकांशी संवाद होता. शिवाय, त्यांचे अनेकांशी मैत्रिपूर्ण संबंधही तयार होतात. त्यामुळे जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांनी नागरिकांशी तयार केलेल्या मैत्रिपूर्ण संबंधाची साथ विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणाºया जिल्हा प्रशासनाला मिळाल्यास त्याचा प्रत्यक्ष फायदाच होणार आहे. सामाजिक बांधीलकी जोपात विविध संघटनाही मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असल्या तरी त्यांचे प्रयत्न सध्या अपुरेच पडत आहेत.
वर्धा जिल्हा प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध सामाजिक संघटना व विविध असोसिएशन तसेच विविध संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. तर औषधी विक्रेता असोसिएशन सहकार्य करण्यास तयार आहे. परंतु, या दोघांमधील संवाद पहिले पुढाकार घेईल कोण? यात अडकला आहे.
औषध विक्रीवर मिळते कमीत कमी १६ टक्के कमिशन
चंद्रपूर येथे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही औषधी विक्रेत्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पाऊल उचलले आहे. तेथे मतदानाच्या दिवशी जो व्यक्ती मतदानाचा हक्क बजावून औषधी खरेदी करण्यासाठी दुकानात येईल त्याला तेथील काही औषधी विक्रेता खरेदी केलेल्या औषधीच्या देयकात १० टक्के सवलत देणार आहेत. विशेष म्हणजे, औषधी विक्रेत्यांना मेडिकल प्रोडक्टवर सरासरी १७ टक्के तर फूड प्रोडक्ट विक्रीतून १० टक्के मार्र्जिन मिळते. चंद्रपुरात राबविण्यात येणाºया उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक औषधी विक्री केंद्रावर मतदानाचा हक्का बजावणाºया व्यक्तीला बोटावरची शाई दाखविल्यावर औषधीवर कमीत कमी १० टक्के सवलत मिळाल्यास मतदानाचा टक्का वाढविण्यास नक्कीच फायदा होणार आहे.
मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून विविध सामाजिक संघटना, संघटना व असोसिएशनला आम्ही आवाहन केले आहे. दोन दिवसांत त्यांचे मत आम्हाला कळणार आहे.
- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी वर्धा.
मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. ही काळाची गरज आहे. जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला लेखी पत्र मिळाल्यास त्यावर चर्चा करून तत्काळ योग्य निर्णय घेण्यात येईल.
- नवल मानधनिया, अध्यक्ष, केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, वर्धा.