हिंगणघाट शहरात औषधांचा वापर होतोय नशेसाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 05:00 AM2021-08-12T05:00:00+5:302021-08-12T05:00:07+5:30

या गोळीत उत्तेजक रसायनांचे मिश्रण केले जात असून त्यामुळे ती आरोग्यास घातक ठरत आहे. या गोळीच्या सेवनाने संपूर्ण शरीर बधीर होते. शरीराला वेदनाही जाणवत नाहीत. या गोळीच्या सेवनाने बेभान झाल्यागत होते. तसेच कोणतेही कृत्य करण्यास अशी व्यक्ती मागे पुढे पाहत नाही.  त्यामुळेच या गोळीला कुत्ता गोळी असे म्हटलं जाते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अल्प्राझोलम असे या गोळीचे शास्त्रीय नाव आहे. कुत्ता गोळीच्या सेवनाने मनुष्य निद्रावस्थेत जातो.

Drugs are being used for intoxication in Hinganghat city! | हिंगणघाट शहरात औषधांचा वापर होतोय नशेसाठी!

हिंगणघाट शहरात औषधांचा वापर होतोय नशेसाठी!

googlenewsNext

चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाने प्रतिबंध घातलेल्या गोळ्यांची हिंगणघाट शहरात बेकायदा विक्री सुरू असून या औषधांचा वापर तरुणपिढी नशेसाठी करीत असल्याची माहिती आहे. हिंगणघाट शहरातील काही विक्रेते दहा ते वीस पट किंमत आकारुन या औषधांची विक्री करीत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या डोळ्यादेखत हे सारं घडत असतानाही कारवाई मात्र, कुठेच दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 
लॉकडाऊननंतर अनेक नशेखोर गुन्हेगार कंगाल झाले आहेत. चोरी, पाकीटमारी, फसवणूक यासारखे  गुन्हे करून ही मंडळी आपली नशेखोरीच सवय पूर्ण करायची. आता एमडी गर्द खरेदी करणे आवाक्याबाहेर असल्याने ‘नर्वस सिस्टिम’ प्रभावीत करणाऱ्या औषधांचा वापर त्याच्यामध्ये वाढला आहे. 
दहा ते २० टक्के अधिकची किंमत आकारुन हा व्यवहार सुरू आहे. काही गुन्हेगार तर अनेक दुकानांमधून ही औषधी खरेदी करून साथीदारांना अधिकच्या किमतीत अवैधपणे विकत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. हिंगणघाट शहरात नायट्राेसेनच्या गोळ्यांचा नशेसाठी वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. नायट्राेसेनच्या गोळ्या गुंगीकारक असल्याने या गोळ्यांचा वापर नशेसाठी केला जात आहे. 
औषधांचा नशेसाठी वापर होणे नवीन नाही. खोकल्याची औषधे, झोपेची औषधे, यासाठी वापरली जातात. सराईत गुन्हेगारांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थीही या नशेचे शिकार झाले आहेत. मात्र, आता ‘कुत्ता गोळी’चे पाळेमुळे हिंगणघाट शहरात पसरल्याने शाळकरी मुलांचेही आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ही गोळी अधिक चर्चेत आली. आता तिचे दुष्परिणामही शहरातील गुन्हेगारी जगतात दिसून येत आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अशा गोळ्या देता येत नाही. मात्र, नशेसाठी वापरण्यात येणारी इतरही बरीच औषधे असून त्यातून मोठी उलाढाल होते आहे. याकडे मात्र, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

काय आहे ‘कुत्ता गोळी’?
औषध म्हणून कुत्ता गोळीचा वापर केला जात असला तरी काही समाजकंटकांनी तिचा नशेसाठी वापर करण्यास सुरुवात केली. या गोळीत उत्तेजक रसायनांचे मिश्रण केले जात असून त्यामुळे ती आरोग्यास घातक ठरत आहे. या गोळीच्या सेवनाने संपूर्ण शरीर बधीर होते. शरीराला वेदनाही जाणवत नाहीत. या गोळीच्या सेवनाने बेभान झाल्यागत होते. तसेच कोणतेही कृत्य करण्यास अशी व्यक्ती मागे पुढे पाहत नाही.  त्यामुळेच या गोळीला कुत्ता गोळी असे म्हटलं जाते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अल्प्राझोलम असे या गोळीचे शास्त्रीय नाव आहे. कुत्ता गोळीच्या सेवनाने मनुष्य निद्रावस्थेत जातो.

हिंगणघाट शहरात ‘रॅकेट’ सक्रिय
हिंगणघाट शहरात मागील काही महिन्यांपासून प्रतिबंधित औषधांची बेकायदा विक्री सुरू आहे. या औषधांचा वापर तरुणाई नशेसाठी करीत असल्याची माहिती असून यातूनच गुन्हेगारी फोफावत चालली आहे. शहरात बेकायदा गोळ्या विक्री करणाऱ्यांचे ‘रॅकेट’ सक्रिय झाले आहे. या गोळ्या नेमक्या शहरात आणत कोण आहे. याची विक्री कुठून होत आहे हे तपासण्याची नितांत गरज आहे. अन्न व औषध विभागाचे याकडे मात्र, दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

अनेक ठिकाणी पोलिसांचे ‘खबरे’ झाले अलर्ट 
शहरात प्रतिबंधित औषधांचा वापर नशेसाठी सुरू असल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनाही असल्याने अनेक ठिकाणी पोलिसांनी जात पाहणी केली. इतकेच नव्हेतर औषधी दुकानांमध्येही जात याबाबतची विचारपूस केली. विक्री होणाऱ्या या गोळ्या नेमक्या येतात तरी कुठून याबाबतचा शोध पोलीस घेत आहे. यासाठी पोलिसांनी शहरात ‘खबरे’ देखील कामाला लावले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

 

Web Title: Drugs are being used for intoxication in Hinganghat city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :medicineऔषधं