काजीपेठ पॅसेंजरमधून दारूसाठा जप्त

By admin | Published: September 21, 2015 02:01 AM2015-09-21T02:01:49+5:302015-09-21T02:01:49+5:30

नागपूर ते काजीपेठ या पॅसेंजर रेल्वेगाडीत दारू वाहून नेली जात असल्याची माहती आरपीएफला मिळाली.

Drugs seized from Kazipet Passenger | काजीपेठ पॅसेंजरमधून दारूसाठा जप्त

काजीपेठ पॅसेंजरमधून दारूसाठा जप्त

Next

आरपीएफची कारवाई : चंद्रपूरला दारू घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक
वर्धा : नागपूर ते काजीपेठ या पॅसेंजर रेल्वेगाडीत दारू वाहून नेली जात असल्याची माहती आरपीएफला मिळाली. यावरून चितोडा रेल्वे स्थानकावर तपासणी करण्यात आली. यात चार पिशव्यांतून ३४ हजार रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
ही विदेशी दारू चंद्रपूर जिल्ह्यात वाहून नेली जात होती. या कारवाईत चार पिशव्यांमध्ये २७० विदेशी दारूच्या बाटल्या ठेवून असल्याचे आढळले. यात ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सुरेश जाट व उमेश जाट रा. जबलपूर या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई रेल्वे पोलीस दलाचे निरीक्षक पीटर गार्वीन यांच्या मार्गदर्शनात विजय घोडेकर, अनिल सार्वे, प्रकाश गोडगे, संजय दळणे यांनी पार पाडली.(स्थानिक प्रतिनिधी)
दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
तळेगाव (श्या.पंत.) : तळेगाव व परिसरात दारूविके्रत्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी दखल घेत अनेक आरोपींना अटक करीत मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यात दारूबंदी असताना तळेगाव व परिसरातील गावांत दारूचे प्रमाण वाढत आहे. याचीच दखल घेत गणेश उत्सवामध्ये शांतता राहावी म्हणून ठाणेदार दिनेश झामरे यांनी ही मोहीम राबविली.
यात मौजा भिवापूर येथील पारधी बेड्यावरील दारू भट्टीवर धाड टाकून किसन निळकंठ भोसले व रणजीत सलीदार पवार यांना दारू काढताना रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून दारू आणि दारू काढण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ६३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवाय सुरेश बंडू भोसले याच्या दारूभट्टीवर पोलिसांनी धाड टाकली असता सदर आरोपी दारूभट्टीवर मोटार सायकल टाकून फरार झाला. तेथून पोलिसांनी मोटार सायकलसह ६० लीटर मोहा दारू किंमत ७ हजार रुपये असा ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चिस्तूर येथील निलेश ललीत पाटील याला राहत्या घरी देशी दारू विकताना पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २४ देशी दारूच्या शिश्या जप्त करण्यात आल्या. तळेगाव येथील कदीर अली रज्जाक अली व सतीश भीमराव गाडगे याच्याकडून एक पेटी देशी दारू किंमत ३ हजार ८५० रुपेय जप्त करण्यात आली. या सर्व आरोपींना मुंबई दारूबंदी कायद्यान्वये अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार दिनेश झामरे, जमादार सुरेश दुर्गे, अविनाश देवगिरकर, निलेश पेटकर, गणेश आवाम, मिनयन तिवारी यांनी केली.(वार्ताहर)

Web Title: Drugs seized from Kazipet Passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.