नशेत बापाला जीवे मारलं! पोराला आजन्म कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 04:02 PM2023-11-25T16:02:33+5:302023-11-25T16:03:48+5:30

व्ही. पी. आदोने यांचा निर्वाळा : १५ हजारांचा दंडही भरावा लागणार

drunk son killed father, Imprisonment for life | नशेत बापाला जीवे मारलं! पोराला आजन्म कारावास

नशेत बापाला जीवे मारलं! पोराला आजन्म कारावास

वर्धा : वडिलांची हत्या करणाऱ्या मुलास आजन्म कारावासाची शिक्षा आणि १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली. हा निर्णय जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. आदोने यांनी दिला. मंगेश कवडू पंढरे (३२ रा. बोरगाव ता. सेलू) असे शिक्षा लागलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी मंगेश याने राहत्या घराच्या बाजूला असलेल्या गोठ्यात झोपून असलेले वडील कवडू यांच्याशी मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करून शाब्दिक वाद केला. वडिलांना हटकले असता मद्यपि मंगेशने लोखंडी कुऱ्हाडीने कपाळावर, चेहेऱ्यावर तसचे छातीवर वार करून ठार मारले होते. याप्रकरणी सिंदी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपी विरूद्ध दोषारोप निश्चित करून प्रकरण पुराव्यांकरिता ठेवले.

पैरवी अधिकाऱ्यांनी मुद्देमाल न्यायालयात जमा केला व रासायनिक विश्लेषणाचे अहवाल प्राप्त करुन न्यायालयात सादर केले. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळ पंच, शेजारी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, सीए माल पोहचविणारे व तपासी अधिकाऱ्यांना पैरवी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी हजर ठेवण्याची तसदी घेतली तसेच परिस्थितीजन्य पुराव्या आधारे प्रकरणात दोषसिद्धी होण्यास मदत मिळाली. 

प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक वंदना सोनुने यांनी केला. आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे आरोपी मंगेश पंढरे याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एच. पी. रणदिवे यांनी कामकाज हाताळले. प्रकरणात एकूण १३ साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. पैरवी अधिकारी अनंदा कोटजावरे यांनी साक्षदारांना न्यायालयात हजर करून मोलाची कामगिरी बजावली.

Web Title: drunk son killed father, Imprisonment for life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.