नागपूर-सीएसटी दुरांतो एक्स्प्रेसमध्ये मद्यपींचा धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 02:46 PM2017-08-21T14:46:19+5:302017-08-21T14:50:40+5:30
नागपूर ते सीएसटी (मुंबई) दुरांतो या सुपरफास्ट रेल्वेगाडीत चार मद्यपींनी धुडगूस घालत तिकीट तपासनीसासह डॉक्टरांना मारहाण केली. शिवाय प्रवाशांनाही जेरीस आणले. ही घटना रविवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास पुलगाव रेल्वे स्थानकावर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागपूर ते सीएसटी (मुंबई) दुरांतो या सुपरफास्ट रेल्वेगाडीत चार मद्यपींनी धुडगूस घालत तिकीट तपासनीसासह डॉक्टरांना मारहाण केली. शिवाय प्रवाशांनाही जेरीस आणले. ही घटना रविवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास पुलगाव रेल्वे स्थानकावर घडली. रेल्वे सुरक्षा दल व पुलगाव पोलिसांनी चौघांना अटक केली.
१२२९० नागपूर-सीएसटी दुरंतो एक्स्पे्रस ही गाडी नागपूर येथून रात्री ८.४० वाजता सुटते. रविवारी रात्री गाडी रवाना झाल्यानंतर नागपूरपासूनच काही युवकांनी मद्यधुंद अवस्थेत धुडगूस घालण्यास सुरूवात केली. ते मुंबई येथे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात आले. त्यांना अडविण्याचा प्रयत्न करणाºया तिकीट तपासणीस बीसीकर योगेंद्र तथा डॉ. पंकज पाठे यांना मारहाण केली. युवकांच्या धिंगाण्यामुळे दुरंतोमधील प्रवाशी जेरीस आले होते.
याबाबत तिकीट तपासणीस योगेंद्र यांनी रेल्वे सुरक्षा बलाकडे तक्रार केली. यावरून रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाºयांसह पुलगावचे पोलीस उपनिरीक्षक मौजे व ताफ्याने गाडीत धुडगूस घालणाºया मदनमोहन तिवारी (३२), अनिल भीमराव गजभिये (३८), मारोती मधुकर बारापात्रे (३९) सर्व रा. नागपूर आणि अमित किसन शर्मा (३६) रा. अमरावती या मद्यपींना ताब्यात घेतले. यातील डॉक्टर व टीसीला मारहाण करणाºया अमित शर्मा याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मदनमोहन, अनिल व मारोती हे तिघे रेल्वे पोलीस बलाच्या ताब्यात असून त्यांच्यावर १४५/१४६ रेल्वे अॅक्ट अन्वये गुन्हे दाखल केल्याची माहिती आरपीएफ प्रमुख सुरेश कांबळे यांनी दिली.
पिंटोग्राफ तुटल्याने दुरांतो थांबविली
च्१२८३४ हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस पुलगाव रेल्वे स्थानकावरून निघाली असता पिंटोग्राफ तुटला. यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. पिंटोग्राफ दुरूस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यामुळे नागपूर-सीएसटी दुरंतो एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, वर्धा-भुसावळ पॅसेंजर या प्रवासी गाड्यांसह मालगाड्या कवठा, दहेगाव व वर्धा रेल्वे स्थानकावरच थांबविण्यात आल्या होत्या. नागपूर येथून सुटल्यानंतर थेट भुसावळला थांबणारी दुरंतो एक्स्प्रेस पुलगावला थांबली. यामुळे धुडगूस घालणाºया आरोपींना अटकाव करता आला.