पक्षविरोधी कारवायांमुळे बसपातून दोघांची हकालपट्टी

By admin | Published: March 17, 2017 01:59 AM2017-03-17T01:59:27+5:302017-03-17T01:59:27+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षशिस्तीचा भंग करून पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल

Due to anti-party activities, both of the expulsion from the BSP | पक्षविरोधी कारवायांमुळे बसपातून दोघांची हकालपट्टी

पक्षविरोधी कारवायांमुळे बसपातून दोघांची हकालपट्टी

Next

जिल्हा सचिवासह एका स्वीकृत सदस्याचा समावेश
वर्धा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षशिस्तीचा भंग करून पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल बहुजन समाज पक्षाचे वर्धा जिल्हा सचिव हर्षवर्धन गोडघाटे व पुलगाव पालिकेतील पक्षाचे स्वीकृत नगरसेवक कुंदन जांभूळकर यांचे बसपातून निलंबन केल्याची माहिती जिल्हाध्यक्षांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
बसपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत नुकत्याच झालेल्या निवडणुकांची समीक्षा झाली. वर्धेत दोन जि.प. व दोन पंचायत समिती निवडून आणले; याचवेळी, पक्षाच्या ध्येयधोरणाच्या विरोधात जात व पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्यासंदर्भात चर्चा प्रदेश कार्यकारिणीत झाली. त्यानुसार १५ मार्च २०१७ रोजी झालेल्या जिल्हा व विधानसभा पदाधिकारी तसेच उमेदवारांच्या बैठकीत मंडळ को-ओर्डीनेट अ‍ॅड. सुनील डोंगरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमलता शंभरकर व जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सचिव हर्षवर्धन गोडघाटे व कुंदन जांभूळकर यांचे पक्ष सदस्यत्व समाप्त करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय झाला. यापुढे जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ता पक्षविरोधी कारवायांमध्ये लिप्त आढळतील अशांचेही त्वरित निलंबन करणार असल्याचे पक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Due to anti-party activities, both of the expulsion from the BSP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.