लिंक फेलमुळे शेतकरी व ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:15 PM2018-06-04T23:15:31+5:302018-06-04T23:16:01+5:30

बँकांच्या लिंक फेलचा सध्या ग्राहकांना मोठाच फटका बसत आहे. येथील भारतीय स्टेट बॅँकेतही लिंक फेलमुळे शेतकरी व ग्राहकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे. आठवड्यातून तीन ते चार दिवस हा प्रकार घडत असल्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प होत असल्याचेच दिसून येत आहे.

Due to the failure of the link farmers and customers suffer | लिंक फेलमुळे शेतकरी व ग्राहक त्रस्त

लिंक फेलमुळे शेतकरी व ग्राहक त्रस्त

Next
ठळक मुद्देआठवड्यातून चार दिवस राहतात व्यवहार ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : बँकांच्या लिंक फेलचा सध्या ग्राहकांना मोठाच फटका बसत आहे. येथील भारतीय स्टेट बॅँकेतही लिंक फेलमुळे शेतकरी व ग्राहकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे. आठवड्यातून तीन ते चार दिवस हा प्रकार घडत असल्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प होत असल्याचेच दिसून येत आहे.
शनिवारी लिंक फेल असल्याने शेतकरी व ग्राहकांना रिकाम्या हाती परत जावे लागले होते. आठवड्याचा पहिला दिवस म्हणून सोमवारी शेतकरी पीक कर्ज, बी-बियाणे खरेदी करण्यास्तव पैसे काढण्यासाठी स्टेट बॅँक गेले; पण आजही लिंक फेलचा बोर्ड लागून दिसल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर होत आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी आपल्या शेतातील काम बाजूला सारून पीक कर्जासाठी बॅँकेचे दरवाजे ठोठावत आहेत; पण लिंक फेलमुळे शेतकºयांचा महत्त्वाचा वेळ वाया जात आहे. सोमवारी लिंक फेल असल्याने दिवसभर शेतकºयांना बसून राहावे लागले. यामुळे नागरिकांत असंतोष पसरला आहे.
अन्य बँका इतर कंपन्यांची कनेक्टिव्हिटी घेऊन कार्यरत
भारत संचार निगमच्या लिंक फेलचा सर्वत्र फटका बसतो. समुद्रपूर येथील अन्य बँकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो; पण बॅँक आॅफ इंडिया, वणा नागरी बॅँक बीएसएनएल सोडून अन्य कंपन्यांची कनेक्टिव्हीटी घेऊन बॅँकेचे व्यवहार सुरळीत ठेवत असल्याचे पाहावयास मिळाले. शिवाय ग्राहक व शेतकºयांना त्रास होऊ नये म्हणून तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे; पण भारतीय स्टेट बॅँक मात्र याला अपवाद ठरत असल्याचे दिसते.

भारतीय स्टेट बॅँकेत मागील काही दिवसांपासून चार-चार दिवस लिंक फेल राहत असल्याने त्रस्त आहोत. शनिवारी स्वस्त धान्य दुकानाची चालान काढायची शेवटचा दिवस होता; पण लिंक फेल असल्याने चालान निघाले नाही. यामुळे येत्या महिन्यात लोकांना धान्य उशिरा मिळेल.
- रामेश्वर बरडे, सरकारी स्वस्त धान्य विक्रेता.

वारंवार लिंक फेल असल्याने मला व्यवहार करण्यात त्रास होत आहे. मागील तीन दिवसांपासून मी कर्जासाठी बॅँकेत चकरा मारत असून लिंक फेलचे कारण सांगून परत पाठविले जात आहे.
- लोमेश्वर बन्सोड, शेतकरी.

बीएसएनएलचे वारंवार केबल तुटत असल्याने लिंक फेल त्रास नेहमीचाच झाला आहे. चार महिन्यांपूर्वी दुसºया लिंकसाठी आम्ही वरष्ठिांना कळविले आहे; पण अद्याप सूचना आलेल्या नाहीत.
- प्रदीप कुलकर्णी, व्यवस्थापक, स्टेट बॅँक, समुद्रपूर.

वरिष्ठांचेही दुर्लक्ष
भारतीय स्टेट बँकेकडे सद्यस्थितीत सर्वाधिक ग्राहक आहेत. यामुळेच या बँकेतील अधिकारी, कर्मचारी ग्राहकांना सौजन्याची वागणूक देत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तक्रारी करूनही वरिष्ठही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने असंतोष पसरला आहे.

Web Title: Due to the failure of the link farmers and customers suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.