वाढलेल्या खुरांमुळे वळू सोसतोय मरणयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:16 AM2019-03-02T00:16:09+5:302019-03-02T00:17:15+5:30

वाढते वय...खपाटीला गेलेलं पोट....चालताना लागणारी धाप... यामुळे थोडं अंतर पार करायचं म्हटले अतिशय कठीणावस्थेतून जावे लागते. अशातच पायांच्या वाढलेल्या खुरा आणखीच डोईजड झाल्याने शहरातील एक वळू असह्य वेदना सहन करीत आहे;.....

Due to the increased hooves, the bull does not die | वाढलेल्या खुरांमुळे वळू सोसतोय मरणयातना

वाढलेल्या खुरांमुळे वळू सोसतोय मरणयातना

googlenewsNext
ठळक मुद्देनगरपालिका प्रशासन, वन्यजीव संघटनांच्या संवेदना झाल्यात बोथट

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाढते वय...खपाटीला गेलेलं पोट....चालताना लागणारी धाप... यामुळे थोडं अंतर पार करायचं म्हटले अतिशय कठीणावस्थेतून जावे लागते. अशातच पायांच्या वाढलेल्या खुरा आणखीच डोईजड झाल्याने शहरातील एक वळू असह्य वेदना सहन करीत आहे; पण त्याच्या या वेदनामय प्रवासाकडे ना पालिका प्रशासनाचे लक्ष आहे, ना वन्यजीव, सामाजिक संघटनांचे. त्यामुळे प्राण्यांप्रतींची ‘करुणा’ हरविली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील कित्येक महिन्यांपासून पायाच्या खुरा वाढलेला वळू शहरात फिरत आहे. शहरातील शिवाजी चौक, पावडे चौक, धंतोली चौक आणि ठाकरे मार्केट परिसरात त्याचा नेहमीच वावर असतो. अर्धे आयुष्य पार केलेला हा वळू पायांच्या वाढलेल्या खुरांमुळे असह्य वेदनेने विव्हळत आहे. खुरा रस्त्याला घासत असल्याने त्याला चालणेही अवघड झाले आहे. परिणामी, त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच आहे.
या वळूबाबत नागरिकांनी अनेकदा नगरपालिका व शहरात कार्यरत विविध वन्यजीव व सामाजिक संघटनांना माहिती दिली. मात्र, कुणालाही पाझर फुटला नाही. केवळ जबाबदारीची ढकलाढकलच अनुभवाला आली. त्यामुळे वन्यजीव, पशुसंवर्धनाचा आव आणणाऱ्या संघटना गेल्या तरी कुठे? मुक्या प्राण्यांच्या या वेदना जर या संघटना अन् पालिकेला कळत नसतील तर प्राण्यांच्या नावे संघटनेचा डोलारा वाढविणे कितपत योग्य आहे. ‘जगण्याने छळलेल्या या वळूची मरणानंतरच त्रासातून सुटका होईल का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे काही संघटना आम्ही प्राणी प्रेमी असल्याचे मिरवितात; पण त्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांना अद्याप जाग आली नसल्याचे दिसून येत आहे.
 

Web Title: Due to the increased hooves, the bull does not die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.