इंझापूर ते जामठा रस्त्याची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:57 AM2019-01-10T00:57:32+5:302019-01-10T00:59:10+5:30

वर्धा - हिंगणघाट मार्गावरील इंझापूर येथून जामठा (कुरझडी) या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून उखडून ठेवला आहे. या रस्त्याने वाहन तर सोडाच साधे पायी चालणेही कठीण झाले आहे.

Due to Jamsa road from Enzapur | इंझापूर ते जामठा रस्त्याची दैनावस्था

इंझापूर ते जामठा रस्त्याची दैनावस्था

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे बुडतात वर्ग : वाहन होत आहे गिट्टीमुळे पंक्चर

लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : वर्धा - हिंगणघाट मार्गावरील इंझापूर येथून जामठा (कुरझडी) या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून उखडून ठेवला आहे. या रस्त्याने वाहन तर सोडाच साधे पायी चालणेही कठीण झाले आहे. यामुळे जणू वाहन चालविताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.
या मार्गाने जामठा, व कुरझडी येथील विद्यार्थी सायकलने तसेच शेतकरी व गावकरी वर्धेत ये-जा करतात मात्र त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याने गिट्टीच गिट्टी असल्याने अनेकांची वाहने सुद्धा पंक्चर होत आहे. या रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जामठा व कुरझडी येथील विद्यार्थी सायकलने ये-जा करतात मात्र काही ठिकाणी ते सायकल चालवू शकतात मात्र काही ठिकाणी सायलक हातात घेवून पायी चालावे लागते. यामुळे त्यांच्या शाळेचे तास सुद्धा सोडावे लागत आहे. याकडे संबंधीत विभागाचे व कंत्राटदाराने लक्ष देत रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी अशी मागणी विद्यार्थी, नागरिकांनी केली आहे. या मार्गाचे बांधकाम सुरू असल्याने जागोजागी वळण रस्ते काढण्यात आले आहे.
दबाईनंतर रस्त्यावर दगड उघडेच
रस्ता जेसीबीच्या सहाय्याने उखडण्यात आला. मात्र त्याचे डांबरीकरण होणार असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र तो रस्ता आता अपघाताला कारणीभूत ठरत आहे. यामुळे जामठा व कुरझडी येथील विद्यार्थी व नागरिक संताप व्यक्त करीत आहे. या रस्त्यावर मोठ मोठे दगड उघडे करून ठेवली असल्याने थातूर मातूर दबाई केली जात आहे. मात्र दगड जैसे थेच असल्याने वाहन चालविताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Due to Jamsa road from Enzapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.