रस्त्यावरील खड्डे उठले वाहनचालकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:57 AM2017-09-13T00:57:01+5:302017-09-13T00:57:01+5:30

वर्धा-हिंगणघाट मार्गावर सध्या छोट्या-मोठ्या वाहनांसह जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत.

Due to the lifting of the potholes on the road | रस्त्यावरील खड्डे उठले वाहनचालकांच्या जीवावर

रस्त्यावरील खड्डे उठले वाहनचालकांच्या जीवावर

Next
ठळक मुद्देवर्धा-हिंगणघाट मार्गाची दैना : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा-हिंगणघाट मार्गावर सध्या छोट्या-मोठ्या वाहनांसह जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. सदर खड्डे बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून एखादी मोठी घटना घडल्यावरच खड्डे बुजवाल काय, असा प्रश्न वाहनचालकांकडून विचारला जात आहे. परिणामी, सदर प्रकरणी तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.
कारंजा (घा.) व यवतमाळ येथून हैद्राबादच्या दिशेने जाणारी जड वाहने वर्धा होत पुढील प्रवासाकरिता निघतात. वर्धा-हिंगणघाट मार्गावर भुगाव शिवारात दोन मोठ्या कंपन्या असून या कंपन्यांमध्ये वर्धा शहरासह आजूबाजूच्या परिसरातील बहुतांश तरुण कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. या दोन्ही कंपन्यांमध्ये कामगारांच्या कामाची पाळी बदलत असताना कर्तव्यावर येणाºया व कर्तव्य संपल्यानंतर दुचाकीने परतीचा प्रवास करणाºयांची मोठी वर्दळ असते. त्यातच वर्धेकडे येणाºया व वर्धेकडून हिंगणघाटच्या दिशेने जाणाºया जड वाहने त्यात अधिक भर टाकतात. सुसाट वाहने पळविणारे जड वाहनचालक बहुदा दुचाकी चालकांना मार्गच देत नाहीत. इतकेच नव्हे तर या मार्गावर बोरगाव परिसरातील फार्मसी महाविद्यालय संपल्यानंतर जीवघेणे ठरणाºया खड्ड्यांची शर्यतच असल्याचे बघावयास मिळते. सदर रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजविण्याकडे संबंधीतांचेही दुर्लक्ष होत आहे. एकूणच या परिस्थितीमुळे या मार्गावरून ये-जा करणे धोक्याचे ठरत आहे. या मार्गावर अनेक अपघात घडले आहेत. रस्ता अपघातात अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. वाहनचालकांना या मार्गाने प्रवास करताना खड्डे चुकविण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत असून वर्धा-हिंगणघाट रस्त्याच्या दैनावस्थेचा वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी आहे.

रुग्ण व गर्भवती महिलांना सर्वाधिक त्रास
वर्धा-हिंगणघाट मार्गावरील इंझापूर, भुगाव, वायगाव (नि.) तसेच कानगाव आदी गावांमधील रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यास त्यांना वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालय, सावंगी येथील रुग्णालयात व सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात येते. याच मार्गाने रुग्ण व गर्भवती महिलांनाही सदर रुग्णालयांमध्ये नेले जाते. वर्धा-हिंगणघाट मार्गावरील खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास रुग्ण व गर्भवती महिलांना सहन करावा लागत आहे.
दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर
वर्धा-हिंगणघाट मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यामधून दुचाकी उसळून झालेल्या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. आशीष यादव व कैलास ससे दोन्ही रा. बोरगाव (मेघे), अशी गंभीर जखमी तरुणांची नावे आहेत. जखमी झालेले दोन्ही तरुण भुगाव येथील कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहेत. ते दुचाकीने ड्युटीवर जात असताना हा अपघात झाला. या घटनेची पोलिसांनी नोंद घेतली आहे.
 

Web Title: Due to the lifting of the potholes on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.