कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:16 PM2018-12-09T23:16:26+5:302018-12-09T23:16:59+5:30

अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने जिल्ह्यात ढगाळी वातावरण तयार झाले आहे. इतकेच नव्हे तर सदर ढगाळी वातावरणादरम्यान जिल्ह्यात पाऊस पडल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.

Due to the low pressure strips, the cloudy atmosphere in the district | कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण

Next
ठळक मुद्देपावसाची शक्यता : वयोवृद्धांसह बच्चेकंपनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने जिल्ह्यात ढगाळी वातावरण तयार झाले आहे. इतकेच नव्हे तर सदर ढगाळी वातावरणादरम्यान जिल्ह्यात पाऊस पडल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. वातावरणात झालेल्या या बदलामुळे स्थानिक प्रशासनाने सतर्क रहावे अशा सूचना संबंधित विभागाकडून प्राप्त झाल्या आहेत.
कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गुरूवार ते रविवारपर्यंत वर्धा जिल्ह्यात ढगाळी वातावरण राहणार आहे. या ढगाळी वातावरणादरम्यान काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे जिल्ह्यावर ही परिस्थिती ओढावली आहे. ढगाळी वातावरणादरम्यान मुसळधार पाऊही होण्याची शक्यता असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगण्यात आले. जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळी वातावरण आल्याने त्याचा सर्वाधिक विपरीत परिणाम वयोवृद्धांसह बच्चेकंपनीवर होत असल्याचे दिसून येते. ताप, सर्दी, खोकला आदी आजारांची लागण झालेले रुग्ण खासगी व शासकीय रुग्णालयात गर्दी करीत आहेत.
 

Web Title: Due to the low pressure strips, the cloudy atmosphere in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.