कालव्याच्या माती भराव्यामुळे शेतात साचले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:09 AM2018-09-26T00:09:17+5:302018-09-26T00:09:52+5:30
नजिकच्या जामणी शिवारातून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. या कालव्याच्या बाजुने पांदण रस्ता असून रस्त्याचे पाणी काढण्याकरिता पाईप टाकण्यात आले आहे. परंतू हे पाईप कालव्यातील मातीमुळे बुजल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : नजिकच्या जामणी शिवारातून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. या कालव्याच्या बाजुने पांदण रस्ता असून रस्त्याचे पाणी काढण्याकरिता पाईप टाकण्यात आले आहे. परंतू हे पाईप कालव्यातील मातीमुळे बुजल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जामणीच्या शिवारातून गेलेला निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा पद्माकर अतकरे यांच्या शेतातून गेला आहे. या कालव्याच्या बाजुने पांदण रस्ताही तयार करण्यात आला असून या पांदण रस्त्यावरील पाणी वाहून जाण्याकरिता चार वर्षापूर्वी सिमेंटचे पाईप टाकण्यात आले होते. परंतु ते पाईप कालव्याच्या मातीनी पूर्णत: बुजून गेल्याने अतकरे यांच्या शेतातील पाणी अडले आहे. हे पाणी शेतातच साचून राहिल्याने शेतातील दोन एकरातील शेंगा भरलेले सोयाबीन पाण्याने सडून गेले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे जवळपास ६० हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. याकरिता संबंधित विभागाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
सदर शेतकऱ्याने अर्ली व्हेरायटीचे ९३०५ सिद्ध कंपनी सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणी सुरूवातीलाच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात केल्यामुळे पेरणी उत्तमरित्या साधली होती. यामुळे सोयाबीन झाडाला शेंगा सुद्धा भरघोष आल्या आहे. शेंगा उत्तमरित्या भरल्या आहेत.
आता चार-पाच दिवसानी कापणी करावी लागत होती. परंतु शुक्रवारी झालेल्या दमदार पावसाचे पाणी शेतात साचल्यामुळे कापणी करणे शक्य अशक्य झाले आहे. शेतातील पाणी सुकण्याकरिता दहा ते बारा दिवसाचा कालावधीत लागणार असल्याने तो पर्यंत हे सोयाबीन पुर्ण सडून जाण्याची शक्यता शेतकºयाने व्यक्त केली आहे.
शुक्रवारच्या पावसाने वाढविली शेतकऱ्यांची चिंता
शक्रवारी आलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने काहींना फायदा तर काहींना नुकसानही सहन करावे लागले.
ते काम ४-५ वर्षापासून रखडले आहे. मागच्या वर्षी त्या शेतकऱ्याने तक्रार केली होती. त्यानुसार टेंडर काढून कंत्राटदाराला सदर कामाचा कंत्राट देण्यात आला. पण पावसाळ्याअभावी विलंब झाला आहे. तरी पण दसऱ्यापासून काम सुरू होणार आहे.
-सुभाष इंगळे, उपअभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा.