कर बुडव्यांवर पालिकेचा बडगा

By admin | Published: February 12, 2017 12:59 AM2017-02-12T00:59:55+5:302017-02-12T00:59:55+5:30

पालिकेंतर्गत येत असलेल्या अनेक व्यवसायिकांनी त्यांच्या मालमत्तेचा कर पालिकेत अदा केला नाही.

Due to the tax burden, | कर बुडव्यांवर पालिकेचा बडगा

कर बुडव्यांवर पालिकेचा बडगा

Next

अनेक दुकाने केली सील : काहींचा कापला पाणी पुरवठा
वर्धा : पालिकेंतर्गत येत असलेल्या अनेक व्यवसायिकांनी त्यांच्या मालमत्तेचा कर पालिकेत अदा केला नाही. अशा मालमत्ताधारकांना पालिकेने नोटीसही बजावले; मात्र त्यांच्याकडून कुठलीही दखल घेतली गेली नसल्याने पालिकेच्यावतीने मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात आली. या कार्यवायीनंतर काही करबुडव्यांनी करावा भरणा केल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. पालिकेच्यावतीने कारवाईचा बडगा येताच अनेकांनी त्यांच्याकडे असलेल्या थकीत करचा भरणा पालिकेत येत केल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
शहरातील मालमत्ताधारकांना कराचे देयक व कर भरणा करण्याबाबत नोटीस देवून सुध्दा त्यांच्याकडून भरणा करण्यात आला नाही. यामुळे विशेष कर वसुली पथकाद्वारे थकीत कर असणाऱ्यांची मालमत्ता जप्तीची व पाणी पुरवठा कपातीची कार्यवाही पालिकेच्यावतीने करण्यात आली. यात बाजार परिसरातील वॉर्ड १७ मधील चंदा जाजोदिया, निकीता साडी सेंटर यांच्याकडे कर थकीत असल्याने त्यांच्या या मालमत्तेला सील ठोकण्यात आले. सील ठोकजाच त्यांच्याकडून कराचा भरणा करण्यात आल्याने ठोकलेले सील उघडण्यात आले. वॉर्ड क्र. ११ मधील मोहन अड्याळकर यांनी कराचा भरणा न केल्यामुळे त्यांच्या मालमत्तेला सील लावण्यात आले आहे. वॉर्ड क्रमांक १० मधील मालमत्ता धारक एन. झेडे तायडे यांनी कराचा भरणा न केल्यामुळे त्यांच्याकडील पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला. पालिकेच्या महाराणा प्रताप संकुलातील मधील यशवंत रामटेके यांनी कर व गाळे भाडे न भरल्यामुळे गाळ्याला सील लावण्यात आले आहे.
ही कार्यवाही नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, कर पथकातील प्रमुख रवींद्र जगताप, कर अधीक्षक गजानन पेटकर, एजाज फारूकी, विजय किनगावकर, अविनाश मरघडे, मुक्कीम शेख, अशोक गायकवाड करसंग्राहक निखील लोहवे, यांची उपस्थिती होती. सक्तीने कर वसुली, मालमत्ता जप्तीची व नळ कपातीची कार्यवाही सतत सुरू राहणार आहे.
मालमत्ता जप्ती व नळ कपाती सारखी अप्रिय कार्यवाही टाळण्याकरिता मालमत्ता धारकांनी थकीत करावा भरणा करावा असे आवाहन वर्धा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Due to the tax burden,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.