दहा व वीसच्या बंडलमुळे खातेदार त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:40 AM2018-07-26T00:40:45+5:302018-07-26T00:42:29+5:30
मागील काही महिन्यांपासून बँकेतून दोन हजारांच्या नोटा गायब होऊन त्या जागी नवीन २०० व ५० च्या नोटा मिळू लागल्या. परंतु आता तर मोठ्या खातेदारांनाही जुन्या १०, २० व १०० च्या नोटांची बंडल देण्यास येत असल्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची खातेदारांची ओरड आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : मागील काही महिन्यांपासून बँकेतून दोन हजारांच्या नोटा गायब होऊन त्या जागी नवीन २०० व ५० च्या नोटा मिळू लागल्या. परंतु आता तर मोठ्या खातेदारांनाही जुन्या १०, २० व १०० च्या नोटांची बंडल देण्यास येत असल्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची खातेदारांची ओरड आहे.
आधीच बँकेच्या संगणकीय, आॅनलाईन कार्यप्रणाली शेतकरी कर्जमाफी पंतप्रधान मुद्रालोन या योजना प्रकरणी होणाऱ्या त्रासामुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त आहे. त्यात लाखो रूपयांचा व्यवहार करणाऱ्या खातेधारकांना बँकेकडून लहान लहान नोटाची बंडल मिळत असल्यामुळे मिळालेली रक्कम बरोबर आहे की नाही. त्यातील जीर्ण झालेल्या नोटा एवढी मोठी ही रक्कम सोबत न्यायची कशी असे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसून येते.
नोटबंदीनंतर बँकेकडून केवळ दोन हजाराच्या नोटा मिळायच्या त्यानंतर ५०० च्या नवीन नोटा चलनात आल्यामुळे हळूहळू बँकेतून दोन हजारांच्या नोटा कमी झाल्या. आता तर चक्क बँकेतून १०,२०, ५०, व १०० च्या जुन्या नोटांची बंडल देण्यात येवू लागल्यामुळे ग्राहक व बँक कर्मचाऱ्यांत वाद निर्माण होऊ लागले.
कुपण, एटीएम, पेटीएमम पासबुक नोंदीसाठी लागणारी रांग, एटीएमध्ये होणारी ठणठणात यामुळे आधीच खातेदार त्रस्त आहेत. त्यातच ही जुन्या नोटांची डोकेदुखी नोटबंदी झाल्यानंतर बँकेत मोठ्या प्रमाणात दोन हजाराच्या नोटा मिळायच्या परंतु आता एकाएकी या नोटांचा होणारा तुटवडा व बँकेतून मिळणाऱ्या जुन्या नोटांची बंडल. यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न खातेदारांच्या मनात निर्माण झाले आहे. परंतू बँकेतील दोन हजाराच्या नोटा एकाएकी गायब होणे व बँकेतून जुन्या नोटांची बंडल एकाएकी कशी झाली हे कोडे न सुटण्यासारखे आहे. बँक प्रशासनाने खातेदारांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. नोटबंदी नंतर तसेही ग्रामीण भागातील एटीएम बंद अवस्थेतच आहे. नागरिकांना बॅकेत पैसे काढण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. त्यात त्यांना चिल्लर १० व २० च्या नोटा दिल्या जात आहे. शेतकरी, व्यापारी यामुळे त्रस्त झाले आहेत. यावर बॅकांनी तोडगा काढावा अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.बॅकांना नागपूरवरून नोटांचा पुरवठा केला जातो.
व्यापाऱ्यांचे सर्वाधिक हाल
पुलगाव ही मोठी व्यावसायिक बाजारपेठ आहे. येथे विविध प्रकारचे व्यावसायिक आहेत. त्यांना दररोज बॅकेतून पैसे काढण्यासाठी जावे लागते. परंतु सध्या बॅकेतून अगदी किरकोळ नोटा वितरित केल्या जात आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बॅक अधिकारी त्यांचे समाधान करू शकत नाही.