टायरअभावी आर्वी बसस्थानकात गाड्या उभ्या
By Admin | Published: July 15, 2016 02:20 AM2016-07-15T02:20:46+5:302016-07-15T02:20:46+5:30
विभागीय परिवहन विभागाच्यावतीने आर्वी विभागाला होणाऱ्या टायरच्या अनियमित पुरवठ्याचा फटका बसत आगाराला बसत आहे.
वेळापत्रक कोलमडले : सर्कसपूर (टोना) येथे चार दिवसांपासून बस पोहोचलीच नाही
आर्वी : विभागीय परिवहन विभागाच्यावतीने आर्वी विभागाला होणाऱ्या टायरच्या अनियमित पुरवठ्याचा फटका बसत आगाराला बसत आहे. टायरअभावी गत चार दिवसांपासून आर्वी आगारातील २६ बसगाड्या जागीच उभ्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील बसफेऱ्या रद्द झाल्याने नगरिकांना ये-जा करण्याकरिता आर्थिक भुर्दंड बसत आहे.
दरराज किमान सहा लाख किमीचा प्रवास करणाऱ्या आर्वी आगाराला बंद गाड्यांमुळे आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. सध्या आर्वी आगारात ७२ बसेस असून त्यापैकी २४ गाड्या लांब पल्यावर धावणाऱ्या आहेत. उर्वरित गाड्या तालुक्यातील ग्रामीण भागात धावत आहेत. आगारात २६ गाड्या उभ्या असल्याने ग्रामीण भागातील बसफेऱ्या रखडल्या आहेत. यामुळे तालुक्यातील सर्कसपूर-टोणा या गावात चार दिवसांपासून बसच पोहचली नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची गावकऱ्यांची ओरड आहे.(तालुका प्रतिनिधी)