कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये वाढली उदासीनता; कापसामागची साडेसाती संपेना !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 06:21 PM2024-12-02T18:21:49+5:302024-12-02T18:22:31+5:30

शेतकऱ्यांचा सवाल : शेतीवरील वाढत्या खर्चाने कंबरडे मोडले

Due to the lack of price for cotton, depression increased among the farmers; The seven and a half weeks behind cotton never ends! | कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये वाढली उदासीनता; कापसामागची साडेसाती संपेना !

Due to the lack of price for cotton, depression increased among the farmers; The seven and a half weeks behind cotton never ends!

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
जिल्ह्यात कपाशीचे मुख्य पीक घेतले जाते; मात्र दरवर्षी लागवड खर्चात मोठी वाढ होऊन कपाशीच्या दरामागची साडेसाती काही संपली नाही. त्यामुळे साहेब जगायचे कसे, असा प्रश्न शेतकरी विचारू लागला आहे. 


सध्या कापसाचे बाजारभाव हे उलट्या दिशेने सुरू असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मागील वर्षी कापसाला चांगला दर मिळाल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा कापसाची लागवड केली. पावसाचा फटका बसून उर्वरित कापूस शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्चुन वेचून घेतला. कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेवर शेतकरी होते; परंतु कापसाचे भाव कोसळत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले. मागच्या वर्षीचा विचार केला तर कापसाला कधी नव्हे एवढा उच्चांकी दर मिळाला होता. यावर्षी देखील तीच अपेक्षा शेतकरी बंधूंना आहे. मागील वर्षी जो कपाशीला चांगला भाव मिळाला होता, परंतु यंदा ही अपेक्षा फोल ठरताना दिसून येत आहे. 


कोणी वाली उरला नाही 
कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कोणी वाली उरला आहे की नाही, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडू लागलाय. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेला कापूस आता घरात ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली. व्यापारी आणि शासन यांच्या कैचीत शेतकरी मात्र अडकून पडलाय.


बोंडअळी टपलेली, औषधी महाग 
जनुकिय बदल करून कपाशीचे बियाने बाजारात आले. किडरोग येणार नाही असे सांगितले जात होते; मात्र गेल्या चार-पाच वर्षात बोंडअळी मोठे नुकसान केले. शिवाय कीटकनाशकांचा खर्च वाढला.


उसनवारी नील अन् शेतात कापूसही नील! 
जिल्ह्यातील बरेच शेतकरी शेतीच्या हंगामात उसनवारीने पैसे काढतात. काही शेतकरी बँकांकडून कर्ज घेण्यासाठी उंबरठे झिजवितात. मात्र, काही उपयोग होत नाही. त्यामुळे उसनवारी व शेतातील कापूसही नील, असे चित्र आहे.


किलोला १० रुपये देऊनही मजूर मिळेना 
कापूस वेचणीसाठी किलोला १० रुपये मोबदला देऊनही मजूर मिळत नाही. मजुरांअभावी कापूस शेतातच पडून राहतो. काढणी करून विकण्यास विलंब झाल्यास व्यापारी अल्प दर देऊन बोळवण करतात.


कापसाचा भाव अजून वाढणार का? 
लागवड खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या हातात काहीही शिल्लक राहत नाही. पुढील हंगामाची व्यवस्था कशी करायची व कुटुंबाचे काय, या दुहेरी प्रश्नात शेतकरी अडकला आहे.


पाच वर्षांत एकदाच १० हजारांपुढे 
वर्ष                       भाव 

२०१९                    ५२०० 
२०२०                    ५८२५ 
२०२१                   १०,००० 
२०२२                    ७५००
२०२३                    ७०५० 
२०२४                    ७१००


व्यापारी/उत्पादक म्हणतात..... 
आमचा नाईलाज कापूस दराचे सरकारी धोरण उत्पादक व व्यापारी यांच्यासाठी उपयुक्त असायला हवे. मात्र, सध्या उलट चालले आहे. त्यामुळे आमचाही नाईलाज आहे. असे व्यापाऱ्यांने सांगितले.


"शासनाने हमीभाव जाहीर केले. मात्र कापसाचे हमीभाव दरवर्षी कागदावरच राहते. अन्य वस्तूंचे दर वाढत असताना शेतमालाचे दर पाडले जात आहेत हा प्रकार नेहमीच शेतकऱ्यांसोबत घडतो." 
- प्रवीण वंजारी, उत्पादक

Web Title: Due to the lack of price for cotton, depression increased among the farmers; The seven and a half weeks behind cotton never ends!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.