वर्धेकरांमुळे सामाजिक कार्याला दिशा मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:26 AM2019-03-11T00:26:34+5:302019-03-11T00:27:21+5:30
१९७७ मध्ये लग्न होऊन वर्ध्यातील बंग परिवारात आली तेव्हा सामाजिक कार्याच्या काहीच गंध नव्हता.पण, वर्धेकरांनी मुलीप्रमाणे प्रेम देऊन सामाजिक कार्यासाठी दिशा दिली, विश्वास निर्माण केला. त्यातुच माझ्या आयुष्यातील सामाजिक कार्यालया सुरुवात झाली, असे मत ज्येष्ठ समाजसेविका तथा सर्चच्या संचालिका पद्मश्री राणी अभय बंग यांनी व्यक्त केले.
वर्धा : १९७७ मध्ये लग्न होऊन वर्ध्यातील बंग परिवारात आली तेव्हा सामाजिक कार्याच्या काहीच गंध नव्हता.पण, वर्धेकरांनी मुलीप्रमाणे प्रेम देऊन सामाजिक कार्यासाठी दिशा दिली, विश्वास निर्माण केला. त्यातुच माझ्या आयुष्यातील सामाजिक कार्यालया सुरुवात झाली, असे मत ज्येष्ठ समाजसेविका तथा सर्चच्या संचालिका पद्मश्री राणी अभय बंग यांनी व्यक्त केले.
वर्धा सोशल फोरमच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळ्याच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. अनेकांत स्वाध्याय मंदिर परिसरात सपन्न झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे तर प्रमुख पाहूणे म्हणून सेल येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश नेहा मोहीत पंचारिया यांची उपस्थिती होती. यासोबतच सत्कारमूर्ती ज्येष्ठ गांधीवादी करुणा फुटाणे, हिंगणघाटच्या कवयित्री मंजिरी भोयर (कोठेवार), आरंभा अनाथालयाच्या संचालिका माधवी शिवाजी चौधरी व बोरी येथील मॉ दुर्गा दारुबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रमीला वाघाडे यांचीही मंचावर उपस्थिती होती. राणी बंग यांनी उपस्थितांसोबत संवाद साधताना आपल्या जीवानाचा प्रवास उलगडा केला. आयुष्य हे सदैव रेड कार्पेट नसते, कधी अपयशही पचवता आलं पाहिजे. कारण अपयशामुळे आपल्यासमोर येणाऱ्या संकटावर मात करण्याची क्षमता निर्माण होते, असेही त्यांनी सांगितले. तसेच केवळ कायद्यात बदल करुन चालणार नाही तर पालकांनी पालकत्व निभविताना आपल्या पाल्यांना सुसंस्कृत व निर्भय बनवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी पालकांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मेघे यांनी फोरमच्या आतापर्यंतच्या वाटचालीची माहिती देत मार्गदर्शनही केले. यावेळी राणी बंग यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सत्कारमूर्तींना बंग यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्तींनी मनोगतातून सर्व सुविधा मिळणे म्हणजे सक्षमिकरण नाही तर उद्याची सक्षम व सुसंस्कारीत पिढी घडविणे म्हणजेच सशक्तिक रण होय असा सूर आवळला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शिल्पा सातव यांनी केले. सन्मान पत्राचे वाचन मनिषा मेघे यांनी केले तर आभार फोरचे सचिव अविनाश सातव यांनी मानले. कार्यक्रमाला वर्धेकरांसह सोशल फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते.