अंतरगावात आगीत गोठा जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 09:58 PM2019-05-31T21:58:08+5:302019-05-31T21:58:35+5:30

परिसरातील अंतरगाव लगतच्या घोडपड परिसरात लागलेल्या आगीत गोठा जळून राख झाला. या आगीत जनावरेही जखमी झाली असून नागरिकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडल्याने गावात धावपळ उडाली होती.

The dung burned in interiors | अंतरगावात आगीत गोठा जळाला

अंतरगावात आगीत गोठा जळाला

Next
ठळक मुद्देजनावरे जखमी : शेतीपयोगी साहित्याची राख, नागरिकांच्या सतर्कतने टळला अनर्थ

लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : परिसरातील अंतरगाव लगतच्या घोडपड परिसरात लागलेल्या आगीत गोठा जळून राख झाला. या आगीत जनावरेही जखमी झाली असून नागरिकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडल्याने गावात धावपळ उडाली होती.
घोडपड परिसरात आगीचे लोळ उठताना दिसताच नागरिकांनी धाव घेतली. पण, तोपर्यंत आगीने पुरुषोत्तम शंभरकर यांच्या गोठ्याला कवेत घेतले होते. या आगीत गोठा जळून राख झाला असून शेती साहित्यासह जनावरांचा चारा व बैलबंडीही जळाली. तसेच जनावरांना आगीच्या झळा लागल्याने जखमी झाले. लगतच्या गोठ्यातील गजानन सातपुते यांच्या मालकीची गायही जखमी झाली. नागरिकांनी आगीची माहिती गिरड पोलिसांना देताच पोलीस कर्मचारी संजय त्रिपाठी, राहुल मानकर यांनी घटनास्थळ गाठून हिंगणघाट येथील अग्निशमन दलाला पाचारण केले.
अग्निशमन दल पोहोचेपर्यंत नागरिकांनी मिळेल त्या साधानाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आग्निशमन दलाने पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. यात शंभरकर व सातपुते यांचे नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Web Title: The dung burned in interiors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग