पालकांच्या दुखण्यावर मुदतवाढीचा उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 09:50 PM2019-06-28T21:50:37+5:302019-06-28T21:50:55+5:30

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची पहिली सोडत राज्यस्तरावरुन ८ एप्रिलला काढण्यात आली. त्यामध्ये १ हजार १०७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

Duration of treatment for the parents' illness | पालकांच्या दुखण्यावर मुदतवाढीचा उपचार

पालकांच्या दुखण्यावर मुदतवाढीचा उपचार

Next
ठळक मुद्देआरटीई प्रवेश प्रक्रिया : शाळांची टाळाटाळ, तर पालकांची उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची पहिली सोडत राज्यस्तरावरुन ८ एप्रिलला काढण्यात आली. त्यामध्ये १ हजार १०७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर दुसरी सोडत तब्बल दोन महिन्यानंतर १५ जून रोजी काढण्यात आली. या सोडतीत ४३९ विद्यार्थ्यांची निवड झाली. पहिल्या सोडतीनंतर शाळांची टाळाटाळ आणि प्रवेश प्रक्रियेबद्दल असलेली अनभिज्ञता यामुळे पालकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्रवेशाकरिता वारंवार मुदतवाढ देण्यात आली. आताही दुसऱ्या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता २९ जूनपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे या दिवासात तरी पालकांनी प्रवेश नोंदविणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये नर्सरी व इयत्ता पहिलीत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के कोट्याअंतर्गत २०१९-२० च्या शैक्षणिक सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. याकरिता जिल्ह्यातील १३३ शाळांची निवड करण्यात आली. या सर्व शाळांमध्ये १ हजार ४०३ जागा रिक्त असताना तब्बल ३ हजार ९९५ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राज्यस्तरावरुन ८ एप्रिलला पहिली सोडत काढली. त्यामध्ये १ हजार १०७ विद्यार्थी पात्र झाले होते.
सुरुवातीला शाळांची टाळाटाळ आणि पालकांचीही अनभिज्ञता यामुळे तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही २९० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. यातच दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर १५ जून रोजी दुसरी सोडत काढण्यात आली. त्यामध्ये ४३९ विद्यार्थी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत प्रवेश करण्याची मुदत दिली होती.
परंतु बहूतांश विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश घेतला नसल्याने त्यामध्ये दोन दिवसाची मुदतवाढ करण्यात आला. २९ जून ही अंतिम मुदत असल्याने विद्यार्थ्यांनी या दिवशी प्रवेश घेतला नाही तर ते या प्रक्रि येतून बाद होण्याची शक्यता नाकारत येत नाही.

Web Title: Duration of treatment for the parents' illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.