मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 10:40 PM2017-10-02T22:40:03+5:302017-10-02T22:40:28+5:30
सेवाग्राम येथे बहुप्रतीक्षित सेवाग्राम विकास आराखडा व सिंदी (रेल्वे) येथील ड्राय पोर्टच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित होता.
वर्धा : सेवाग्राम येथे बहुप्रतीक्षित सेवाग्राम विकास आराखडा व सिंदी (रेल्वे) येथील ड्राय पोर्टच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर अतिथी म्हणून ना. नितीन गडकरी, ना. सुधीर मुनगंटीवार ना. मदन येरावार यांची उपस्थिती होती. कार्यक्रम ऐन मध्यावर असताना मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच शेतकºयांनी घोषणा देत निषेध नोंदविला. निषेध नोंदविणारे शेतकरी सेलू येथील असून त्यांनी कापसाचे फसलेल्या चुकºयांची मागणी केली.
सिंदी (रेल्वे) बाजार समितीत असलेल्या श्रीकृष्ण जिनिंगचा मालक टालाटुले याने या भागातील शेतकºयांना गंडा घालून पळ काढला. या व्यापाºयाकडून रक्कम मिळण्याकरिता शेतकºयांनी वर्धेपासून दिल्लीपर्यंत आंदोलने केली. यात त्यांना चुकारे देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. शेतकºयांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने टालाटुलेच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे आदेश दिले; मात्र वेळीच लिलावावर स्थगनादेश आला. यामुळे शेतकºयांना अद्यापही त्यांचे फसलेले चुकारे मिळाले नाही. यामुळे संतापलेल्या शेतकºयांनी या कार्यक्रमात येत आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्र्यांना आश्वासनाची आठवण देण्याकरिता त्यांचे भाषण सुरू होताच नारेबाजी केली. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. यावरून नारेबाजी करणाºया शेतकºयांना पोलिसांनी पकडून सेवाग्राम पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले.
सेवाग्रामच्या सरपंचाशी चर्चा टाळली
सेवाग्राम येथे बहुचर्चित सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विकास कामे करण्यात येत आहे. या कामांत सेवाग्राम गावाचा कुठलाही विकास होणार नसल्याचा आरोप सेवाग्रामच्या सरपंच रोशणा जामलेकर यांनी केला. या संदर्भातच त्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याकरिता गेल्या असता त्यांना परत पाठविल्याचा आरोप त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
आयटक पदाधिकारी नजर कैदेत
आयटक संलग्न अंगणवाडी कर्मचारी युनियन व आशा गट प्रवर्तक संघटनेचे दिलीप उटाणे, वंदना कोळणकर, संध्या म्हैसकर, विजया पावडे, मैना उईके, माला भगत यांना पकडून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात आयटक पदाधिकारी यांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते.मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांच्याशी भेट करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते; पण तसे झाले नाही. यामुळे या कर्मचाºयांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करून शासनाचा निषेध नोंदविला.