पालिकेच्या ‘ड्रीम’ प्रोजेक्टचा धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 10:22 PM2020-02-16T22:22:44+5:302020-02-16T22:24:48+5:30

शहरातील गोळा होणारा कचरा साठविण्यासाठी बोरगाव (मेघे) लगतच्या इंझापूर शिवारात पालिकेचा कचरा डेपो आहे. येथे पालिकेने जवळपास अडीच कोटी रुपये खर्चून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला. सध्या हा प्रकल्प निविदाप्रक्रियेतून कंत्राटदाराला दिला असून या प्रकल्पात दररोज गोळा होणाऱ्या १६ ते १७ टन कचऱ्यासून दीड टन खताची निर्मिती केली जाते.

The dust of the Municipal 'Dream' project | पालिकेच्या ‘ड्रीम’ प्रोजेक्टचा धुरळा

पालिकेच्या ‘ड्रीम’ प्रोजेक्टचा धुरळा

Next
ठळक मुद्देघनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आग : सात तासानंतर आग आटोक्यात, ८० लाखांच्या नुकसानीचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नगरपालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या इंझापूर शिवारातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला पहाटे चार वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत प्रकल्पातील मशीन, वेस्ट प्लास्टिक, शेडचा काही भाग जळाल्याने ७० ते ८० लाख रुपयाच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे. या परिसरात कचरा व खत असल्याने आग चांगलीच धुमसली होती. तब्बल सात तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
शहरातील गोळा होणारा कचरा साठविण्यासाठी बोरगाव (मेघे) लगतच्या इंझापूर शिवारात पालिकेचा कचरा डेपो आहे. येथे पालिकेने जवळपास अडीच कोटी रुपये खर्चून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला. सध्या हा प्रकल्प निविदाप्रक्रियेतून कंत्राटदाराला दिला असून या प्रकल्पात दररोज गोळा होणाऱ्या १६ ते १७ टन कचऱ्यासून दीड टन खताची निर्मिती केली जाते. या प्रकल्पामध्ये खत निर्मितीकरिता विविध मशीन लावण्यात आल्या आहे. या प्रकल्पाने जोर पडकला असतानाच रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक या केंद्रात आगीचा भडका उडाला. आग लागल्याची माहिती बोरगाव व इंझापूरातील काही नागरिकांनी पालिकेच्या नगराध्यक्षांसह अधिकाऱ्यांना दिली. लागलीच पहाटे साडेचार वाजता पालिकेचे उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, स्वीकृत नगरसेवक जयंत सालोडकर, पालिकेचे कर्मचारी अशोक ठाकूर व आरोग्य सभापती अहूजा यांच्यासह इतरांनीही प्रकल्पाकडे धाव घेतली.आगीचे रौद्ररुप धारण केल्याने तात्काळ वर्धा नरगपालिका, देवळी नगरपालिका व उत्तम गल्वा कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. याची माहिती महाविरतणलाही देण्यात आली.
महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळासह परिसरातील विद्युत पुरवठा बंद केला. जवळपास १८ ते १९ बंब पाण्याचा मारा केल्यानंतर सकाळी साडेदहा वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या भीषण आगीत प्रकल्पातील बेलिंग मशीन, सेक्रेनिंग मशीन आणि दोन ग्रेडर मशीन जळाल्या. यासोबतच ओला आणि सुका साठविणाऱ्या शेडचाही काही भाग जळाल्याने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी पोलिसांत कुठलीही तक्रार झालेली नसल्याचे सांगण्यात आले.

विदर्भातील एकमेव प्रकल्प
वर्ध्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा विदर्भातील एकमेव प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या भरवशावरच पालिकेला आतापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान म्हणून २३ कोटी रुपयाचे बक्षीस मिळवून दिले आहे. यासोबतच राज्यातील पहिला पाच पालिकांमध्ये वर्धा नगरपालिकेचा समावेशही याच प्रकल्पामुळे झाला आहे. सतत तीन वर्ष ४ कोटी, ६ कोटी व १३ कोटीचे बक्षीस मिळविणारी वर्धा नगरपालिका ही विदर्भातील एकमेव ठरली आहे. अशा या महत्त्वाकांक्षी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आज आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.

मुख्याधिकाºयांकडून ‘नो रिस्पॉन्स’
पालिकेचा महत्त्वाकांक्षी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला रविवारी पहाटे आग लागली. याची अधिकृत माहिती जाणून घेण्याकरिता दुपारी पालिकेचे मुख्याधिकारी जगताप यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. ऐरवीही काही माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तर ते प्रतिसाद देत नाही. त्यामुळे माहिती जाणून घेण्यास अडथळा निर्माण होतो.

Web Title: The dust of the Municipal 'Dream' project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.