कामगारांना नियमाप्रमाणे वेतन व सुविधा देणे व्यवस्थापकाचे कर्तव्य

By Admin | Published: April 24, 2017 12:20 AM2017-04-24T00:20:48+5:302017-04-24T00:20:48+5:30

शासकीय नियमाप्रमाणे वेतन भविष्य निर्वाह निधी कामगार विमा योजनेचा लाभ व इतर सुविधा कामगारांना मिळाल्या पाहिजे.

Duties of the Administrator to pay workers the wages and facilities as per rules | कामगारांना नियमाप्रमाणे वेतन व सुविधा देणे व्यवस्थापकाचे कर्तव्य

कामगारांना नियमाप्रमाणे वेतन व सुविधा देणे व्यवस्थापकाचे कर्तव्य

googlenewsNext

रामदास तडस यांच्या मध्यस्थीने संप मागे : मागण्या मान्य न केल्यास स्वत: उपोषण करणार
पुलगाव : शासकीय नियमाप्रमाणे वेतन भविष्य निर्वाह निधी कामगार विमा योजनेचा लाभ व इतर सुविधा कामगारांना मिळाल्या पाहिजे. पुलगाव कॉटन मिल बंद पडल्यामुळे शहरातील हजारो कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. गत ८-९ वर्षांपासून नव्याने जयभारत टेक्सटाईल्स या नावाने हा वस्त्रोद्योग सुरू झाला असून जवळपास ४०० युवकांना रोजगार मिळाला खरा; पण अत्यल्प वेतनावर काम करणाऱ्या कामगारांनी प्रत्येकवेळी प्रशासनाशी तडजोड करून उत्पादन सुरू ठेवले. कामगार न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कामगारांना शासकीय नियमानुसार वेतन व इतर सुविधा देणे व्यवस्थापकांचे कर्तव्य आहे. जर कामगारांच्या मागण्या केल्या नाही तर मी स्वत: मील समोर उपोषणास बसणार आहे. तसेच या संदर्भात मील मालक प्रवीण तायल यांच्याशी मुंबई येथे चर्चा करून आठ दिवसांत हा प्रश्न निकाली काढू, तोपर्यंत संप स्थगित करून उद्यापासून कामगारांनी काळ्या फिती लावून कामावर रूजू व्हावे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले. या आश्वासनावर संप स्थगित करण्यात आला.
विविध मागण्यांसाठी जयभारत टेक्सटाईल्स या वस्त्रोद्योगातील कामगारांनी १६ एप्रिलपासून संप पुकारला होता. २१ एप्रिल रोजी नागपूर येथे कामगार प्रतिनिधी व व्यवस्थापक यांच्यात झालेली चर्चा फिस्कटली. या चर्चेत व्यवस्थापकाकडून कामगारांना दरमहा १० रुपये प्रतिदिन प्रमाणे महिन्याची २५० ते ३०० रुपये वाढ, तिसऱ्या पाळीत काम करणाऱ्या कामगारास या व्यतिरिक्त प्रतिदिन २० रुपये वाढ तसेच कामगारांचे वेतन दरमहा १५ ते १८ तारखेपर्यंत नियमीत करण्यासंदर्भात चर्चा झाली. याशिवाय व्यवस्थापनाच्या मॉलमधून जीवनावश्यक वस्तूचा उधारीवर पुरवठा करणे हा मुद्दाही चर्चेत होता. परंतु या मागण्या मान्य न झाल्यामुळे आज अखेर खा. तडस यांनी कामगार मंडपास भेट दिली. तसेच व्यवस्थापनाच्यावतीने उपस्थित असणारे व्यवस्थापक अशोक रायजादा, कारखाना व्यवस्थापक विनोद पांडे, महादेव कणसे, जयभारत टेक्सटाईल्स कामगार संघटनेचे मार्गदर्शक कामगार नेता भाष्कर इथापे, अध्यक्ष बाळू शहागडकर, सचिव अमित शेळके यांच्यात चर्चा झाली. येत्या आठ दिवसांत उद्योगाचे अध्यक्ष प्रवीण तायल यांच्याशी मुंबई येथे कामगार प्रतिनिधी व मालकात खा. तडस यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. तोपर्यंत संप स्थगित करण्यात आल्याचे कामगार नेता इथापे यांनी भाषणातून जाहीर केले.
याप्रसंगी जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, पं.स. सदस्य किशोर गव्हाळकर, नितीन बडगे, दीपक फुलकरी, कपील शुक्ला, कामगार प्रतिनिधी दिनेश खेडेकर, विनोद बाभुळकर यांच्यासह मोठ्या संख्येने कामगारांची उपस्थिती होती. प्रास्ताविक ओंकार धांदे यांनी केले. यावेळी बसपा कामगार संघटनेचे सिध्दार्थ डोईफोडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर आभार दिनेश खेडकर यांनी मानले. काही महिला कामगारांनी व्यवस्थापनाबाबत खा. तडस यांच्याकडे तक्रार केली असता खा. तडस यांनी व्यवस्थापक रायजादा यांना या तक्रारीकडे लक्ष देण्याची सूचना दिली.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Duties of the Administrator to pay workers the wages and facilities as per rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.