अथक परिश्रमातून साडेपाच एकरात साडेदहा लाखांचे उत्पन्न
By admin | Published: March 17, 2016 02:54 AM2016-03-17T02:54:25+5:302016-03-17T02:54:25+5:30
शेती हा तोट्याचा व्यवसाय असल्याचे आपण बहुतेकांच्या तोडून एकतो. पण पारंपरिक शेतीला नाविण्यपूर्ण उपक्रमांची जोड देत ...
जसापूरच्या शेतकऱ्याची शेतीनिष्ठा : अभिनव प्रयोग करणारे परिसरातील एकमेव शेतकरी
गजानन पाठे सारवाडी
शेती हा तोट्याचा व्यवसाय असल्याचे आपण बहुतेकांच्या तोडून एकतो. पण पारंपरिक शेतीला नाविण्यपूर्ण उपक्रमांची जोड देत साडेपाच एकर शेतीतून दरवर्षी साडेदहा लाखांच्या आसपास उत्पन्न घेण्याची किमया कारंजा तालुक्यातील जसापूर येथील श्रावण बकारामजी बन्नगरे (५०) या शेतकऱ्याने करून दाखविली आहे. परिसरातील अभिनव प्रयोग करणारे शेतकरी अशी नवी ओळख त्यांनी तयार केली आहे.
येथून १० वर्षांपूर्वी बन्नागरे हे देखील केवळ सोयाबीन व कपाशीचे पीकच घेत होते. उत्पन्नही जेमतेमच व्हायचे. पण संपूर्ण जमीन त्यांनी ओलिताखाली आणल्यावर शेतामध्ये नवनवे प्रयोग करण्याचा निश्चय त्यांनी केला. शेतात पूर्णपणे ठिबक सिंचन पद्धतीद्वारे ओलित सुरू केले. यानंतर फळपिकांकडे आपला मोर्चा वळवीत संत्रा, डाळींब, पपई, शेवगा, टमाटर आदी पिकांसह जरबेरा ही पिके घ्यायला सुरुवात केली.
मागील वर्षी पपईमधून त्यांना दीड लाखांचे उत्पादन झाले. त्याचप्रकारे डाळींब अडीच लाख रूपये, संत्रा दीड लाख रूपये, जरबेरा फुलांपासून चार लाख रूपये तर टमाटर या पिकापासून एक लाख रूपये असे एकणू साडेदहा लाखांचे उत्पादन झाले. अभिनव प्रयोग करणारे शेतकरी अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. २६ जानेवारी २०१६ रोजी राष्ट्रीय केमिकल्स फर्टीलायझर्सद्वारे त्यांचा पुरस्कृत करण्यात आले आहे.