अपंगांच्या मागण्यांकरिता अन्नत्याग
By admin | Published: March 23, 2017 12:45 AM2017-03-23T00:45:53+5:302017-03-23T00:45:53+5:30
येथील पंचायत समिती कार्यालयासमोर प्रहार अपंग बेरोजगार, अधिकारी व कर्मचारी क्रांती संघटनेच्यावतीने
कारंजा पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन
कारंजा (घा.) : येथील पंचायत समिती कार्यालयासमोर प्रहार अपंग बेरोजगार, अधिकारी व कर्मचारी क्रांती संघटनेच्यावतीने बुधवारी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. अपंगांच्या प्रलंबीत मागण्यांकरिता शासनाला वेळोवेळी निवेदने सादर करण्यात आली. मात्र या मागण्यांना मान्यता मिळाली नसल्याने आंदोलन करुन गटविकास अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
अपंग कर्मचाऱ्यांच्या सेवा अर्धवट करण्यात आल्या आहे. अपंगांची ग्रामपंचायत, नगरपंचायत स्तरावर अर्धवट नाव नोंदणी केली आहे. ३ टक्के निधी वाटण्यात उदासीनता आहे. त्याचप्रमाणे अंत्योदय योजना कार्डाचे वाटप केलेले नाही, ज्या अपंगाची अजुनपर्यंत नावनोंदणी झाली नाही त्यांना ३ टक्के निधी वाटप केलेला नाही शिवाय अंत्योदय कार्ड सुध्दा देण्यात आले नाही. यासर्व मागण्यांची दखल घेत उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
बिडीओंना दिले निवेदन
ग्रामपंचायत व नगर पंचायत स्तरावर प्रत्येक अपंगांची नोंद घेतली पाहिजे. ३ टक्के निधी तसेच अंत्योदय कार्ड मिळाले पाहिजे. स्वयंरोजगारासाठी व्यवसाय सुरू करण्याकरिता २०० चौ. फुट गाळ्यांची उपलब्धता करून द्यावी. अपंगांना विनाअट घरकुल मंजूर करावे. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा, आदी मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या.