मसालेदार पदार्थ खाताय अन् बैठकीची कामे; मूळव्याधीचा धोका, घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 06:02 PM2024-11-21T18:02:14+5:302024-11-21T18:02:53+5:30

विविध कारणांमुळे समस्या वाढतीवर : तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा त्वरित आहारात बदल

eating spicy food and meeting activities; Risk of hemorrhoids, be careful | मसालेदार पदार्थ खाताय अन् बैठकीची कामे; मूळव्याधीचा धोका, घ्या काळजी

eating spicy food and meeting activities; Risk of hemorrhoids, be careful

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
गुदद्वारातील आजारांबाबत अलीकडे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढलेल्या आहेत. अधिक वेळ बैठे काम करणे, फायबरची कमतरता, पाणी कमी पिणे यासह विविध कारणांमुळे मूळव्याधीची समस्या वाढत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेणे आवश्यक आहे, अन्यथा हा आजार वाढत जातो. त्यानंतर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय राहत नाही.


गुदद्वाराच्या अंतिम भागात सुजलेल्या शिरा, मलविसर्जन करताना रक्तस्राव, वेदना जाणवणे ही मूळव्याधीची पहिली लक्षणे आहेत. यापैकी कोणतीही लक्षणे पाहिल्यास ताबडतोब डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे, मूळव्याध धोकादायक किंवा जीवघेणा नसतो. दीर्घ कालावधीसाठी स्थितीकडे दुर्लक्ष केल्यास, गंभीर गुंतागुंत होऊ शकते. 


मूळव्याध अन् फिशरची लक्षणे सारखीच आहे काय?
मूळव्याधीमध्ये रक्तस्राव होताना रुग्णाला वेदना होत नाही, तर फिशरमध्ये रक्तस्त्रावासोबतच वेदना पण होतात. मूळव्याध, भगंदर, फिशर या गुदद्वारासंबंधीच्या समस्यांपैकी सर्वात सामान्य समस्या आहेत. हे तिन्ही रोग प्रोक्टोलॉजीओ- तर्गत येतात आणि काही सामान्य लक्षणे असतात. तथापि, यापैकी प्रत्येक विकार भिन्न आहेत आणि उपचारांची भिन्न पद्धत आहे. मूळव्याध, भगंदर, फिशर यात फरक आहे.


मूळव्याधीची लक्षणे कोणती?
गुदद्वाराजवळ वेदना किवा जळजळ होणे, मलविसर्जनाच्या वेळी रक्त येणे, गाठीसारखे फुगलेले भाग जाणवणे, खाज येणे किंवा अस्वस्थता वाटणे आदी. लक्षणे मूळव्याधीची आहेत.


मूळव्याध कसा टाळता येतो? 
भरपूर फायबर असलेले पदार्थ आहारात वापरावे. फळे, भाज्या, आणि पूर्ण धान्यांचा समावेश करावा. दिवसाला कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. नियमित व्यायाम करावा. दीर्घकाळ बसण्याचे टाळावे. मलविसर्जनाची वेळ नियमित ठेवावी. जास्त दाब येईल, अशा जड वस्तू उचलू नयेत.


भगंदर, फिशर एकच आहे काय? 
भगंदर म्हणजे, गुदद्वाराच्या ग्रंथींना संसर्ग होतो आणि पू वाहणे सुरू होते. फिशर म्हणजे, गुदद्वा- राभोवती फाटणे किंवा कट होणे, हे खूप वेदना- दायक आहे. मलविसर्जन करताना तुटलेल्या काचेतून आपण जात आहोत, असे जाणवते. 


मूळव्याध होण्याची कारणे
पोटात गाठी होणे, पोटात पाणी भरणे, यकृताचा आजार, गर्भधारणा, अतिजड वजन उचलणे, दीर्घकाळ बसणे, गुदद्वारासंबंधीचा संभोग, कमी फायबरयुक्त आहार घेणे, सततचा खोकला आदी कारणे मूळव्याधीची आहेत. दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठता, मलत्याग करताना जास्त कुंथन करणे, अधिक दिवसांपासूनचा अतिसार, आनुवंशिकता हीसुद्धा कारणे मूळव्याधीची आहेत.


 

Web Title: eating spicy food and meeting activities; Risk of hemorrhoids, be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.