शिक्षणाचा उपयोग समाज, देशहितासाठी व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 05:00 AM2022-06-08T05:00:00+5:302022-06-08T05:00:28+5:30

आपले शिक्षण समाजासाठी आणि देशासाठी उपयोगात आणून आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी सिद्ध व्हा, असा संदेश महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या १३ व्या दीक्षान्त समारोहात दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधताना दिला. समारोहात विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे यांच्या हस्ते स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना पदवी व पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Education should be used for the benefit of society and country | शिक्षणाचा उपयोग समाज, देशहितासाठी व्हावा

शिक्षणाचा उपयोग समाज, देशहितासाठी व्हावा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : विद्यार्थ्यांसाठी दीक्षान्त समारोह म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात होय. पुस्तकातील ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कृती आणि अनुभवातून स्वत:ला अधिक समृद्ध करा. आपले शिक्षण समाजासाठी आणि देशासाठी उपयोगात आणून आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी सिद्ध व्हा, असा संदेश महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या १३ व्या दीक्षान्त समारोहात दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधताना दिला. समारोहात विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे यांच्या हस्ते स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना पदवी व पुरस्कार प्रदान करण्यात आले.
देशातील खासगी विद्यापीठेही शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावत असून मेघे अभिमत विद्यापीठाचा नावलौकिक मी ऐकून आहे, असेही राज्यपाल कोश्यारी म्हणाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसलो तरी या विद्यापीठाला मी अवश्य भेट देईन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या समारोहात ज्येष्ठ ओरल व मॅक्सिलोफेशिअल सर्जन डॉ. जे. एन. खन्ना (मुंबई) व पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया, दिल्लीचे उपाध्यक्ष डॉ. संजय झोडापे यांना डॉक्टर ऑफ मेडिकल सायन्स उपाधीने सन्मानित करण्यात आले. समारोहाच्या अध्यक्षस्थानी कुलपती दत्ता मेघे तर विशेष अतिथी म्हणून भुवनेश्वर येथील एसओए विद्यापीठाचे प्रकुलपती प्रा. डॉ. अमित बॅनर्जी, जर्मनी येथील रिसर्च अँड डेव्हलपमेंट ग्रामर एजीचे उपाध्यक्ष डॉ. मायकल बॉर्ब, प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. राजीव बोरले, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे, कराड येथील कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा यांची उपस्थिती होती. विद्यापीठ विद्यार्थ्यांची दुसरी आई असून जगात तुमची ओळख निर्माण करून देण्याचे काम ही आई करते. या देशाची ‘मदर इंडिया’ ही ओळख निर्माण करणारे नवयुगनिर्माते तुम्ही आहात, असे प्रतिपादन डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. मंचावर प्रकुलगुरू डॉ. ललित वाघमारे, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसुळकर, अशोक चांडक, डॉ. एस. एस. पटेल, सतीश देवपुजारी, डॉ. डी. के. अग्रवाल, डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. अभ्युदय मेघे, रवी मेघे, मनीष वैद्य, डॉ. आदित्य पटेल, डॉ. प्रज्ञा दांडेकर, डॉ. मीनल चौधरी, डॉ. सुनीता वाघ, डॉ. विद्या लोहे, डॉ. गौरव मिश्रा, डॉ. संतोष झा, डॉ. राकेश कोवेला, डॉ. सारिका डाखोळे, डॉ. खोब्रागडे, जया गवई, डॉ. के.टी.व्ही. रेड्डी, डॉ. प्रियांका जयस्वाल यांची उपस्थिती होती. समारोहाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. संचालन डॉ. नाजली काझी आणि डॉ. समर्थ शुक्ल यांनी केले. सांगता डॉ. प्रियांका निरांजने यांच्या पसायदान गायनाने व राष्ट्रगीताने करण्यात आली.

या गुणवंतांचा मान्यवरांनी केला गौरव...
या समारंभात युवा वैज्ञानिक वैष्णवी तोष्णीवाल, मधुमिता चौधरी, रक्षा कनोजे, नम्रता आगाशे, पूर्वा गुलरांधे यांच्यासह वैद्यकीय शाखेतील डॉ. थडीबोइना उहा, डॉ. प्रीती साहू, डॉ. कोनिका चौधरी, डॉ. पलक केडिया, डॉ. मैथिली जोशी, डॉ. सिंजिनी अग्रवाल, डॉ. सिद्धार्थ सेठी, डॉ. दिती गंधसिरी, डॉ. वंदना पंजवानी, डॉ. प्रियांक भट्ट, डॉ. आदित्य रंजन, डॉ. आदित्य मुंदडा, दिव्या लोहिया, हिमाली बेंडले, ईशा सहाई, शुभम भारती, रजल बोरा, नेहा झाडी, दंत शाखेतील डॉ. निधी मोटवानी, डॉ. वृषाली झामरे, डॉ. स्वप्नजा गोसावी, डॉ. दीक्षा अग्रवाल, डॉ. हेतल पुरोहित, डॉ. स्फूर्ती बने, आदिती गंधेवार, कस्तुरी वानखेडे, डॉली गबाडा, आयुर्वेद शाखेतील डॉ. आशिष निंभोरकर, डॉ. ममता साहू, साक्षी गंगात्रे, भौतिकोपचार शाखेतील निकिता सेठ, आदिती आंबेडकर, महेक मोहनी, वैष्णवी ठाकरे, नर्सिंग शाखेतील हर्ष गंधारे, प्रणय बहादुरे, दर्शन विधाते, शीतल चौधरी, हिना रोडगे, दीपाली घुंगरूड, लालहरिहतपल्ली, तृप्ती उके, मयूर वंजारी तर परावैद्यकीय शाखेतील जान्हवी चौहान, पुष्पांजली साहू या गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य, चान्सलर अवॉर्ड आणि रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पीएच.डी. आणि फेलोशिप प्राप्त विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. 

प्रियाल श्रीवास्तवला ११ सुवर्णपदके  

-  जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी प्रियाल श्रीवास्तव हिला सर्वाधिक ११ सुवर्णपदकांसह एकूण १५ पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 
-  यासोबतच, स्नातकोत्तर विद्यार्थिनी डॉ. ऐश्वर्या घुले हिला ७ सुवर्णपदके, डॉ. आदित्य मुंदडा, सुषमा एस., रोहित वंजारी यांना प्रत्येकी ४ सुवर्णपदके, दृष्टी लोहिया, रितिका मल्होत्रा, यश पारेख, हर्षिता यांना ३ सुवर्ण पदके, शरद पवार दंत महाविद्यालयातील मेहक्षा बत्रा हिला ४ सुवर्ण पदके, महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाची अनुराधा इंगळे हिला ३ सुवर्ण पदके प्राप्त झालीत.
-  तसेच परावैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांना यावेळी आरोग्य सेवेची दीक्षा देण्यात आली.

 

Web Title: Education should be used for the benefit of society and country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.