शिक्षणप्रणाली एकांगी नव्हे तर सर्वांगीण व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:21 PM2017-12-12T22:21:49+5:302017-12-12T22:22:11+5:30
शिक्षण संबंधित वर्तमानात काही आव्हाने आहेत. याबाबत लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. शिक्षणातील महत्त्वपूर्ण मुद्यांवर विचार होण्याची गरज आहे.
आॅनलाईन लोकमत
सेवाग्राम : शिक्षण संबंधित वर्तमानात काही आव्हाने आहेत. याबाबत लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. शिक्षणातील महत्त्वपूर्ण मुद्यांवर विचार होण्याची गरज आहे. वर्तमानातील शिक्षणनितीचा प्रामाणिकपणे व बारकाईने अभ्यास करून घातक बाबींवर चर्चा करून चालणार नाही. संकटाच्या निवारणाचा मार्ग शोधावा लागेल. स्वातंत्र्यानंतर शिक्षण व भाषांवर जनपक्षीय धोरणांची उणीव राहिली. यामुळे शिक्षण प्रक्रिया एकांगी नव्हे तर सर्वांगीण झाली पाहिजे, असे मत हैद्राबाद येथील प्रा. लालटू हरजिंदर यांनी व्यक्त केले.
नई तालीम समिती परिसरातील शांती भवनमध्ये तीन दिवसीय आॅल इंडिया कौंसिलींग आॅफ स्टुडंटस स्ट्रगलर्सचे दुसरे सत्र पार पडले. यावेळी ते बोलत होते. दिल्ली विश्व विद्यालयाचे निवृत्त प्रा.डॉ. मधु प्रसाद म्हणाले की, शिक्षणावर सर्वांचा सारखा अधिकार आहे. यावर चालणारे अभियान तीव्र व्हावे. २००९ ची शिक्षण प्रणाली जनविरोधी होती. केंद्र सरकार राज्यातील शिक्षण व्यवस्था मोडित काढण्याच्या मार्गावर व गरीबांच्या मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव आखत आहे. शिक्षणप्रणाली नागरिकांच्या मुक्तीसाठी नाही तर गुलामीकडे नेणारी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पर्यावरण तज्ज्ञ मेहेर इंजिनीयर म्हणाले की, विद्यार्थ्यांना मध्यान्ह जेवनाची व्यवस्था केली; पण ती भ्रष्टाचाराचे कुरण ठरली. शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचार वाढला. स्थानिक भाषेकडे दुर्लक्ष करण्यात येत असून बाह्य भाषेचा आग्रह धरला जात आहे.
म. गांधी हिंदी विद्यापीठाचे विद्यार्थी नरेश गौतम व शांती निकेतन विश्वभारती विद्यालयाचे रोहीत कुमार यांनी विद्यार्थी संघटनांची बैठक व सुरूवात बँगलोरला झाली होती. देशभरातील शिक्षणावर विचार व कार्य करणाºया युवक संघटनांमध्ये समन्वय असावा, या उद्देशाने बैठक, चर्चेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
सुमारे ६० विद्यार्थी संघटनांचे १०० प्रतिनिधी कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते.