ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस सर्वधर्म समभावाचे प्रतिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:46 PM2017-12-02T23:46:02+5:302017-12-02T23:47:05+5:30

मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलादुन्नबी हा धार्मिक सण शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला. शहरातील हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना प्रेमाने ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शहरातील चौका -चौकात विद्युत रोषणाई, स्वागतद्वार, पताका लावण्यात आल्या.

Eid-e-Miladunnabi's procession symbolizes the god of the Sovereign | ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस सर्वधर्म समभावाचे प्रतिक

ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस सर्वधर्म समभावाचे प्रतिक

Next
ठळक मुद्देखासदारांच्या उपस्थितीत कार्यक्रम : दुपट्टे देऊन मुस्लीम बांधवांचा सत्कार, शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलादुन्नबी हा धार्मिक सण शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला. शहरातील हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना प्रेमाने ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शहरातील चौका -चौकात विद्युत रोषणाई, स्वागतद्वार, पताका लावण्यात आल्या. गांधी चौकातील जामा मस्जीदवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. नगर परिषद व कच्छी मेमन ट्रस्टद्वारे खा. रामदास तडस यांच्या उपस्थितीत कार्यक्रमही घेण्यात आला.
सकाळी १० जामा मस्जीद येथून भव्य जुलूस काढण्यात आला. यात चित्ररथ, डीजे, समाजातील हजारो आबाल-वृद्धांचा समावेश होता. हा जुलूस आठवडी बाजार, हिंगणघाट फैल, नगर परिषद हायस्कूल, नगर परिषद, स्टेशन चौक, इंदिरा चौक मार्गे मस्जीदमध्ये पोहोचला. येथेही धार्मिक ग्रंथाचे पठण आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मार्गात ठिकठिकाणी या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यात बसपा, दरबार समिती, यंग मुस्लीम मंच, बाबा बर्फानी ग्रूप यांच्यासह शहरातील विविध संघटनांनी शोभयात्रा व मुस्लीम मौलाना यांच्यासह माजी नगराध्यक्ष साबीर कुरेशी, मौला शरीफ, शकील खान, मुस्ताक, सादीक अली यांसह अनेकांचा सत्कार करून ईदीच्या शुभेच्छा दिल्या.
नगर पालिका कार्यालयाजवळ खा. तडस, नगराध्यक्ष शीतल गाते, उपाध्यक्ष आशिष गांधी, गटनेता राजीव जायस्वाल, राज्य ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संजय गाते, जिल्हा सचिव नितीन बडगे, भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे यांच्यासह नगरसेविका माधुरी इंगळे चंपा सिद्धानी, ममता बडगे, जयभारतचे कांबळे यांच्यासह नगरसेवक व भाजपा कार्यकर्त्यांनी मुस्लीम बांधवांचा दुपट्टे देऊन सत्कार केला.
इंदिरा चौकात कच्छी मुस्लीम मेमन ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात खा. तडस यांच्या उपस्थितीत हाजी इकबाल हाजी फारूख, काँग्रेस शहराध्यक्ष रमेश सावरकर, महिला काँग्रेस शहराध्यक्ष रंजना पवार, शब्बीर बोहरा, नोमान अली, माजी नगराध्यक्ष भगवानसिंग ठाकूर, पवन साहू, दीपक पालीवाल, गोविंद दैया यांच्यासह अनेकांनी मौलवी सरफराज मौलवी तौफीक अस्फाक हुसेन तथा ज्येष्ठ मुस्लीम बांधवांचा सत्कार केला. याप्रसंगी लाडू वितरित करण्यता आले. ईदच्या माध्यमातून हिंदू-मुस्लीम बांधवांनी शहरात राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव, सामाजिक बंधूभावनाचा परिचय दिला. शहरात मुख्य मार्ग तथा अन्य भागात रोषणाई करण्यात आली होती.
दोन कुटुंबांना खासदारांची सांत्वना भेट
कार्यक्रमानंतर खा. रामदास तडस यांनी शहरातील माजी नगरसेविका ललितादेवी चौबे आणि माजी नगराध्यक्ष स्व. वासुदेव सहारे यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. शिवाय सिद्धार्थ नवयुवक वाचनालयाचे अध्यक्ष मारोतराव नांदेकर यांच्या घरी जाऊन त्यांचा प्रकृतीबाबत विचारणा केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत भाजपाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते होते.

Web Title: Eid-e-Miladunnabi's procession symbolizes the god of the Sovereign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.