साडेआठ हजार शेतकऱ्यांना फवारणी पंपासाठी प्रतीक्षा !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 01:41 PM2024-09-13T13:41:31+5:302024-09-13T13:42:17+5:30

लॉटरी पद्धतीने होणार निवड : साडेनऊ हजार पंपांचे मिळाले उद्दिष्ट

Eight and a half thousand farmers waiting for the spray pump! | साडेआठ हजार शेतकऱ्यांना फवारणी पंपासाठी प्रतीक्षा !

Eight and a half thousand farmers waiting for the spray pump!

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप आणि कापूस साठवणुकीसाठी बॅग १०० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी नऊ हजार ५६० फवारणी पंपांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अर्ज करण्याच्या मुदतीपर्यंत १६ हजार ५९४ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. उद्दिष्टाच्या तुलनेत कृषी विभागाला मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले असून, लॉटरी पद्धतीने निवडीमुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहे हे तितकेच खरे.


सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने १०० टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप आणि कापूस साठवणुकीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागण्यात आले होते. या पोर्टलवर अर्ज करण्यात अडचणी आल्याने शेतकऱ्यांना अर्ज करण्यास तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. ३१ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना अखेरची मदत देण्यात आली होती. जिल्ह्यात नऊ हजार ५६० फवारणी पंप वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच हजार ८५० पंपांचे उद्दिष्ट देण्यात आले. याकरिता तब्बल १३ हजार २२४ इतके अर्ज प्राप्त झालेत. तर तेलबिया पिकांकरिता तीन हजार ७१० पंपांचे उद्दिष्ट असून, तीन हजार ३७० अर्ज प्राप्त झालेत. पंपांसाठी जिल्ह्यातील १६ हजार ५९४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. लक्षांकाच्या तुलनेत अर्जाची संख्या अधिक असल्याने लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, फवारणीपंप भेटणार केव्हा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 


हंगाम अखेरीस, तरी पंप मिळेना ! 
शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनवर फवारणीसाठी पंप मिळणार आहे. या हंगामात सोयाबीन पिकाचा हंगाम संपत आला आहे तर कापसाचा हंगाम आता सुरू आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यात अनेक तांत्रिक अडचणी आल्याने मुदतवाढ देण्यात आली होती. आतापर्यंत ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यासाठी मोठ्या संख्येने अर्ज करण्यात आले. लॉटरी पद्धतीने निवडही झाली, तरीदेखील शेतकऱ्यांना पंप मिळालेले नाही. हंगाम संपल्यानंतर पंप मिळणार काय, असा प्रश्न शेतकऱ्यांतून केला जात आहे.


सोडतीतून साडेआठ हजार शेतकऱ्यांची निवड 
• योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप आणि कापूस साठवणुकीसाठी बॅग १०० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. 
• याकरिता जिल्ह्याला ९ हजार ५६० पंप वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले. यासाठी तब्बल १६ हजार ५९४ अर्ज प्राप्त झाले आहेत. 
• उद्दिष्टाच्या तुलनेत दुपटीने अर्ज आल्याने लॉटरी काढण्यात आली. ८ हजार ४६० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.


"जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर बॅटरी संचलित फवारणी पंप देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला ९ हजार ५६० हजार १५० पंपांचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातून १६ हजार ५९४ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, पंपांचा अद्याप पुरवठा झालेला नाही. तो लवकरच होणार असून , त्यानंतर वितरणाची प्रक्रिया होणार आहे." 
- रमेश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

Web Title: Eight and a half thousand farmers waiting for the spray pump!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा