पाणवठ्यावर आठ मोरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:11 PM2018-11-26T22:11:58+5:302018-11-26T22:12:11+5:30

खरांगणा वनपरिक्षेत्राच्या झडशी सहवन क्षेत्राच्या माळेगाव ठेका येथील नैसर्गिक पाणवठ्यावर (विहीरा) येथे आठ मोर शेतकरी नितीन बन्सीलाल जयस्वाल यांना मृतावस्थेत आढळून आले. शिकाऱ्याने पाणवठ्यात विषारी द्रव कालवले व तेच पाणी पिऊन मोरांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज सध्या वर्तविला जात आहे. सुरुवातीला आठ मोर असताना पंचनामा करते वेळी त्यापैकी दोन मोर गहाळ असल्याचे दिसून आले, हे विशेष.

Eight peacock deaths on the water level | पाणवठ्यावर आठ मोरांचा मृत्यू

पाणवठ्यावर आठ मोरांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देपाण्यात विषारी द्रव कालवल्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : खरांगणा वनपरिक्षेत्राच्या झडशी सहवन क्षेत्राच्या माळेगाव ठेका येथील नैसर्गिक पाणवठ्यावर (विहीरा) येथे आठ मोर शेतकरी नितीन बन्सीलाल जयस्वाल यांना मृतावस्थेत आढळून आले. शिकाऱ्याने पाणवठ्यात विषारी द्रव कालवले व तेच पाणी पिऊन मोरांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज सध्या वर्तविला जात आहे. सुरुवातीला आठ मोर असताना पंचनामा करते वेळी त्यापैकी दोन मोर गहाळ असल्याचे दिसून आले, हे विशेष.
माळेगाव ठेका हा जंगलव्याप्त परिसर आहे. त्यापरिसरात नैसर्गिक तसेच कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. नितीन जयस्वाल यांच्या शेताजवळील नाल्यात नैसर्गिक पाणवठा (विहीरा) आहे. तो थंडगार पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. अन्यत्र पाणी नसल्याने जंगलातील मोर, हरीण व अन्य वन्यप्राणी येथे नियमित पाणी पिण्यासाठी येतात. ही बाब हेरून शिकाºयाने शिकार करण्याच्या उद्देशाने पाण्यात विषारी द्रव कालवले असावे आणि तेच पाणी पिऊन मोरांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज सध्या बांधला जात आहे.
पानवठ्यावर मोर मृत अवस्थेत असल्याचे लक्षात येताच जयस्वाल यांनी घटनेची माहिती तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एम. वाडे यांना दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी वाडे, क्षेत्र सहायक के. एस. वाटकर, वनरक्षक दीक्षा अंबुडारे, एम. पी. पिसे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अवैध शिकारी होत असल्याबाबत आठ दिवसांपूर्वी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर आता या घटनेमुळे शिक्का मोर्तब झाला आहे.
मागील याच हंगामात माळेगाव ठेका परिसरातील नैसर्गिक पाणवठ्यावर मोराची हाडे व सापळा आढळून आला होता. उल्लेखनिय म्हणजे मृत मोर केवळ पाच ते सहा महिन्यांचे होते. खरांगणा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी शवविच्छेदन केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मोराचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा उलगडा शवविच्छेदन अहवाल आल्यावरच होईल. आम्ही शवविच्छेदन अहवाल लवकर मिळावा अशी विनंती संबंधितांकडे केली आहे.
- पी. एम. वाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगणी.

नुकतेच शवविच्छेन झाले असून प्राथमिक अंदाजानुसार पशुवैद्यकीय अधिकारी यांचे मते मोरांना आजार झाला असावा, त्यामुळे मोरांचा मृत्यू झाला.
- के.एस. वाटकर, क्षेत्र सहाय्यक, झडशी

Web Title: Eight peacock deaths on the water level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.