ईदगाहसह समाज भवनासाठी जिल्हाधिकाºयांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 11:49 PM2017-09-06T23:49:14+5:302017-09-06T23:49:30+5:30

मुस्लीम समाजातील नागरिकांच्या नमाज पठनासाठी व समाज भवनासाठी शासकीय जमीन देण्यात यावी या मागणीचे निवेदन जामा मस्जीद ट्रस्ट कमेटी व अल रजा बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने आमदार पंकज भोयर यांच्या नेतृत्त्वात...

 Elders with Idgah to collect the District Collector | ईदगाहसह समाज भवनासाठी जिल्हाधिकाºयांना साकडे

ईदगाहसह समाज भवनासाठी जिल्हाधिकाºयांना साकडे

Next
ठळक मुद्देमुस्लीम बांधवांनी पंकज भोयर यांच्या नेतृत्त्वात दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मुस्लीम समाजातील नागरिकांच्या नमाज पठनासाठी व समाज भवनासाठी शासकीय जमीन देण्यात यावी या मागणीचे निवेदन जामा मस्जीद ट्रस्ट कमेटी व अल रजा बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने आमदार पंकज भोयर यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आले.
स्थानिक महात्मा गांधी विद्यालयाला लागून १०० वर्ष जुनी मुस्लीम ईदगाह आहे. यापैकी ७३३२ चौरस फुट जागा कमेटीच्या मालकीची आहे. सदर जागा नमाज पठनासाठी अपुरी पडत आहे. तसेच ७३३८ चौरस फुट पैकी ३८७५ चौरस फुट जागेची रेल्वेने आखणी केली आहे. याबाबत रेल्वेकडून कोणत्याही प्रकारची लेखी सूचना देण्यात आली नाही. नमाज पठनासाठी शहर व परिसरातील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने येतात. त्यांना जागा अपुरी पडत असल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे ईदगाहला लागून असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील शिट क्र. २६ मधील भूखंड क्र. ८/१ पैकी १५०० स्केअर फुट जागा ईदगाहसाठी देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मुस्लीम समाजातील नागरिक, विद्यार्थ्यांसाठी शासन विविध योजना राबविण्यात आहे. आजही मुस्लीम समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असून त्यांना या योजनांची माहिती नाही. सुसज्य समान भवन नसल्याने मुस्लीम समाज बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, शिट क्र. ३ भूखंड क्र. १२/१ मधील ३० हजार चौरसफुट जागा समाज भवनासाठी देण्यात यावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना जामा मस्जीद कमेटीचे सैय्यद आसिफ अली, काझी झेनुल आबेदीन, अदुल गनी, लईक अहेमद फारूकी, सरदार खॉ बलदार खॉ, काझी रईसुद्दीन, अलरजा संस्थेचे हाजी तौफीक कुरेशी, सैय्यद झैनुल आबेदीन काझी, हाजी सोहराब तुरक, हाजी सलमान अख्तर, असलम अहमद खॉ पठाण, शेख फरीद कुरेशी, इम्रान लांबा, शेख अकमल, शेख अफजल आदींची उपस्थिती होती.

Web Title:  Elders with Idgah to collect the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.