बापुराव देशमुख सहकारी सुतगिरणीची निवडणूक अविरोध

By Admin | Published: June 30, 2016 02:10 AM2016-06-30T02:10:02+5:302016-06-30T02:10:02+5:30

सहकार महर्षी स्व. बापूराव देशमुख शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्यादीतच्या २१ जागांसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक १० जुलै रोजी होऊ घातली होती;

Election of Bapura Deshmukh Co-operative Societies | बापुराव देशमुख सहकारी सुतगिरणीची निवडणूक अविरोध

बापुराव देशमुख सहकारी सुतगिरणीची निवडणूक अविरोध

googlenewsNext

परंपरा अबाधित : तडजोडीत देशमुख १३ आणि गोडे गट ८ जागांवर समाधानी
वर्धा : सहकार महर्षी स्व. बापूराव देशमुख शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्यादीतच्या २१ जागांसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक १० जुलै रोजी होऊ घातली होती; मात्र माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या सहकार व प्रतिस्पर्धी डॉ. शिरीष गोडे यांच्या परिवर्तन गटात अखेरच्या क्षणी तडजोड झाल्याने निवडणूक अविरोध झाली.
उमेदवारी अर्ज परत घेण्याचा बुधवार अखेरचा दिवस होता. तडजोडीत सहकार गटाला १३ आणि परिवर्तन गटाच्या वाट्याला आठ सदस्य देण्याचा निर्णय झाला. यामुळे उर्वरित उमेदवारांचे नामांकन परत घेण्यात आले. सहकार गटाचे कापूस उत्पादक मतदार संघातील सुरेश देशमुख, अ‍ॅड. सुधीर कोठारी, शफात अली, शरद पावडे, सुनील भोगे, पांडुरंग उजवणे, नरेंद्र थोरात, घनश्याम डाखोळे हे उमेदवार अविरोध ठरलेत. तर महिला प्रवर्गात शोभा काळे अविरोध आहे. बिगर कापूस उत्पादक मतदार संघातून रमेशचंद्र राठी, ज्ञानेश्वर झलके, इतर मागासवर्ग प्रवर्गातून संदीप देशमुख व भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून अशोक महाजन हे उमेदवार अविरोध ठरले आहेत.
परिवर्तन गटाचे कापूस उत्पादक मतदार संघातील डॉ. शिरीष गोडे, प्रदीप धांदे, भैय्यासाहेब हिवंज, सुभाष कडू, प्रमोद हांडे, तर महिला प्रवर्गातून किरण महल्ले या उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. बिगर कापूस उत्पादक मतदार संघातून मदन भोगे हे अविरोध ठरले आहे. अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातून राजेंद्र कांबळे यांची अविरोध निवड झाली आहे.
१९९४ पासून सुतगिरणीला अविरोध निवडणुकीची परंपरा लाभली आहे. यावेळी मात्र भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने निवडणुकीची अपेक्षा मतदारांनी वर्तविली होती.
सहकार आणि परिवर्तन गटातर्फे उमेदवारांचे नामांकन अर्जही दाखल करण्यात आले होते. जिल्ह्यात सुमारे ९ हजार ८०० मतदारसंख्या असलेल्या या सुतगिरणीची निवडणूक होईल, असे वातावरण तयार झाले होते. मात्र नामांकन अर्ज परत घेईपर्यंत समेट घडून आणण्यात दोन्ही गट प्रमुखांना यश आल्याने ही निवडणूक टळली. दोन्ही गटातील या तडजोडीत सहकार गटाला १३ आणि परिवर्तन गटाला ८ जागा देण्याचा निर्णय झाला. निवडणुकीत कोणीही प्रतिस्पर्धी नसल्यामुळे १० जुलैला होऊ घातलेली निवडणूक आता होणार नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)

६२ पैकी ४१ जणांचे नामांकन परत
बापुराव देशमुख सहकारी सुतगिरणीच्या या निवडणुकीत यंदा दोन गट समोरासमोर आल्याने दोन्ही गटातून एकूण ६२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. नामांकन परत घेण्याचा बुधवार अंतिम दिवस असल्याने ४१ जणांनी अर्ज परत घेतले. यामुळे उर्वरीत नामांकनात १३ देशमुख व आठ गोडे गटाचे सदस्य राहिल्याने ते अविरोध ठरले. एकाचवेळी ४१ नामांकन परत घेण्यात आल्यामुळे या निवडणुकीची अपेक्षित चुरस येथेच संपली.

बापुराव देशमुख सहकारी सुतगिरणीची निवडणूक अनेकांनी अर्ज परत घेतल्याने अविरोध ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नामांकन परत घेण्याचा आज अंतिम दिवस होता. अविरोध निवडणुकीची घोषणा गुरुवारी होईल.
- जे. एम. तलमले, निवडणूक अधिकारी, तथा सहा. उपनिबंधक, वर्धा

Web Title: Election of Bapura Deshmukh Co-operative Societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.